Donald Trump Sarkarnama
देश

Donald Trump India Pakistan Conflict Claim : भारत-पाकिस्तान संघर्ष थांबविल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा; नोबेल पुरस्कारावरून खंत

Donald Trump again claims his 250% tariff threat stopped the India-Pakistan conflict and expresses regret over not winning the Nobel Peace Prize : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या प्रचारसभेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत भारत आणि पाकिस्तान संघर्ष थांबल्याचा दावा केला आहे.

Pradeep Pendhare

Donald Trump India Pakistan war claim : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष थांबविल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या प्रचारसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करताना, भारत आणि पाकिस्तानवर 250 टक्के आयातशुल्क लादण्याचा इशारा दिल्यामुळेच दोन्ही देशांमधील संघर्ष थांबल्याचे त्यांनी म्हटले.

या संघर्षासह आठ युद्धे थांबविल्याचा दावा करतानाच, शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांनंतरही नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याची खंत ट्रम्प यांनी व्यक्त केली.

अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी मध्यावधी निवडणुका होणार आहेत. या मध्यावधी निवडणुकांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांमधून काँग्रेसमधील सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना किती पाठिंबा आहे, याचीही परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर फ्लोरिडा येथे झालेल्या प्रचारसभेत ट्रम्प यांनी भारत (India)-पाकिस्तान संघर्षाचा मुद्दा उपस्थित केला.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्याचे नमूद करत, त्यांच्यावर 250 टक्के आयातशुल्क लादण्याचा इशारा आपण दिला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष थांबल्याचा दावा त्यांनी केला. या प्रक्रियेत संयुक्त राष्ट्रांची कोणतीही मदत घेतली नसल्याचेही ट्रम्प (Donald Trump) यांनी सांगितले.

मात्र, ट्रम्प यांनी वारंवार केलेला हा दावा भारताने फेटाळला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर दोन्ही देशांच्या लष्करी यंत्रणांमध्ये झालेल्या चर्चेतून शस्त्रसंधीचा निर्णय झाल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान संघर्ष थांबविण्याचे श्रेय घेण्यावरून ट्रम्प यांचे दावे आणि भारताची भूमिका यांमध्ये मतभेद कायम आहेत.

आठ युद्धे थांबवल्याचा दावा

दरम्यान, आपल्या राजनैतिक प्रयत्नांचा उल्लेख करत ट्रम्प यांनी नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘‘मी आठ युद्धे थांबविली. मला नोबेल पुरस्कार मिळाला का? नाही,’’ असा सवाल त्यांनी प्रचारसभेत केला. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांच्या प्रचारातही भारत-पाकिस्तान संघर्ष आणि नोबेल शांतता पुरस्काराचा मुद्दा ट्रम्प यांनी पुन्हा चर्चेत आणला आहे.

भारतासाठी या निवडणुकीचे महत्त्व

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी या निवडणुका त्यांच्या कार्यकाळाच्या मध्यावर जनतेचा कौल तपासणारी महत्त्वाची परीक्षा ठरणार आहेत. भारताच्या दृष्टीनेही या निवडणुकांचे परिणाम महत्त्वाचे ठरू शकतात. व्यापार, स्थलांतर, तंत्रज्ञान आणि भारत-अमेरिका संबंधांच्या व्यापक स्वरूपावर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT