Narendra Modi And Donald Trump.jpg Sarkarnama
देश

Donald Trump And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अधुरं स्वप्नं आता 'मित्र' डोनाल्ड ट्रम्प पूर्ण करणार?

Deepak Kulkarni

Donald Trump News : अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला भारताच्या अनेक धोरणांवर आक्षेप व्यक्त केला होता.आता पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असून ते सध्या त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. पण या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्नं पूर्ण करणार का अशी चर्चा जोर धरू लागलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लढवली होती. या निवडणुकीत मोदींनी थेट 400 पार चा नारा दिला होता. पण या निवडणुकीत इंडिया आघाडीनं भाजपला अडीचशेच्या आत रोखलं. त्यामुळे भाजपसह मोदींचंही स्वबळावर बहुमतात सत्तेत येण्याचं स्वप्नं भंगलं. पण आता मोदींचा हाच चारशे पारचा नारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा उतरलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार यांनी डोनाल्ड ट्रम्प मागील आठवड्यात पक्षाच्या एका कार्यक्रमात या निवडणुकीत आपला 400 किंवा त्यापेक्षा अधिक मतांनी विजय होणार असल्याचा दावा केला होता. या त्यांच्या दाव्यामुळे देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपची(BJP) अब की बार, चारसौ पार च्या घोषणेची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे चार महिने शिल्लक आहेत.राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी (21 जुलै) राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतली.तसंच आपला कमला हॅरिस यांना पाठिंबा असल्याचं जाहीरही केलं. हॅरिस या बायडन यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी मानल्या जातात.

सध्या तरी 27 राज्यांतील शिष्टमंडळांनी हॅरिस यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर हॅरिस यांची डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे. तर रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्र्म्प यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अमेरिकेतली व्हाईट हाऊसमधील 50 राज्यांमध्ये विस्तारलेल्या 538 पैकी मतांपैकी विजयासाठी 270 इलेक्टोरल मते आवश्यक असतात.त्यातील डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन हे दोन्ही पक्ष प्रत्येकी 20 राज्ये घेतात.तसेच 10 टॉस अप राज्ये सोडण्यात येतात. या राज्यांची मते कोणालाही जाऊ शकतात. प्रत्येक राज्यात लोकप्रिय मते जिंकणारा पक्ष निवडणुकीत सर्व मते घेतो.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन 251 इलेक्टोरल मते जिंकण्याच्या मार्गावर असल्याचे सध्याच्या सर्वेक्षणानुसार दिसून येत आहे.त्यांना बहुमतासाठी आवश्यक असलेला 270 चा आकडा गाठण्यासाठी आणखी अवघे 19 मतांची गरज भासणार आहे.त्यासाठी त्यांना सहा किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

अडचणी काय..?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन अडचणी ठरण्याची शक्यता आहे. त्यात पहिली अडचण ही कॅलिफोर्नियामधून निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या राज्यात 54 इलेक्टोरल मतं आहेत. त्यात 52 प्रतिनिधी आणि दोन सिनेटर्स आहेत. हेच कॅलिफोर्निया 1992 पासून डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. यावेळीही तिथे बदल होण्याची कमी शक्यता नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT