Congress : मुस्लिम अल्पसंख्याक आघाडी आक्रमक; विधानसभेच्या त्या 14 जागांसाठी काँग्रेस प्रभारींची मागितली वेळ...

Assembly Election 2024 : लोकसभा आणि विधान परिषदेत एकही जागा सोडण्यात आली नसल्याने मुस्लिम समाजाने पक्षश्रेष्ठींकडे यापूर्वीच आपली नाराजी दर्शवली होती.
Ramesh Chennithala
Ramesh ChennithalaSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 23 July : महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप निश्चित व्हायचे असले तरी मुस्लिम अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने काँग्रेसकडे महाराष्ट्रातील विधानसभेच्या 14 जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला यांना पत्राद्वारे या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी वेळही मागण्यात आली आहे.

लोकसभा आणि विधान परिषदेत एकही जागा सोडण्यात आली नसल्याने मुस्लिम समाजाने (Muslim community) काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे यापूर्वीच आपली नाराजी दर्शवली होती. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार वर्षा गायकवाड यांची जागा काँग्रेसचे (Congress) नेते नसीम खान यांना देण्याची मागणी केली होती. त्या मागणीवर विचार करण्यात आला नव्हता.

विधान परिषदेच्या रिक्त जागेवर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी करण्यात आली होता. विधान परिषदेच्या रिक्त 11 जागांपैकी एक आमदार मुस्लिम समाजाचा होता. मात्र, काँग्रेसने एकच उमेदवार या निवडणुकीत उभा केला होता. प्रज्ञा सातव निवडूनसुद्धा आल्या आहेत. वारंवार डावलले जात असल्याची भावना मुस्लिम समाजामध्ये निर्माण होत आहे.

अलीकडेच समाजाच्या प्रतिनिधींनी एक संयुक्त बैठक रामटेक येथे घेतली. त्या बैठकीत समाजाच्या प्रतिनिधींनी एकजूट होऊन आपला आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यात अल्पसंख्याक समाजाची अधिक संख्या असलेल्या एकूण 14 विधानसभा मतदारसंघाची यादी तयार करण्यात आली. याच जागा पक्षाकडे मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ramesh Chennithala
Union Budget 2024 : ‘हे तर खुर्ची बचाव बजेट’; विरोधकांनी मोदी सरकारच्या वर्मावरच ठेवले बोट...

मुस्लिम समाजाने नागपूरमधील मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ, अमरावती शहर, अकोला पश्चिम, कारंजा-वाशीम, औरंगाबाद, नांदेड, परभणी, धुळे, मालेगाव, सोलापूर शहर, पुणे शहर, मुंब्रा, मीरा भाईंदर, भिवंडी या मतदारसंघाचा समावेश आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव झिया पटेल, महासचिव शकूर नगानी, सचिव डॉ. नदीम, सचिव आर.एम. खान नायडू, काँग्रेस विधी विभागाचे माजी अध्यक्ष आसिफ कुरेशी, अझिझ मिर्झा, उपाध्यक्ष वर्धा इकरम हुसेन, युथ काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहम्मद असीम अली, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष माजीद कुरेशी यांनी भेटीसाठी रमेश चेन्निथाला यांची वेळ मागितली आहे.

Ramesh Chennithala
Vijay Wadettiwar On Eknath Shinde : बिहार, आंध्रला विशेष पॅकेज, "महाराष्ट्राला काय? ठेंगा!"; विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com