Donald Trump speaks out angrily against Israel’s alleged arms-treaty breach and calls for an immediate halt to bombing operations.  Sarkarnama
देश

Donald Trump : बॉम्ब टाकू नका, विमाने परत बोलवा..! डोनाल्ड ट्रम्प यांना संताप अनावर, इस्त्राईलकडून झटका

Trump Denounces Israeli Bombing Actions : इराण आणि इस्त्राईलमध्ये शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर आता ट्रम्प यांची मोठे विधान समोर आले आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Rajanand More

Iran vs Israel : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्त्राईलमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली होती. दोन्ही देशांनी त्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले होते. अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर काही तासांत ही शस्त्रसंधी झाली. पण आता इस्त्राईलच्या बाजूने लढणाऱ्या ट्रम्प यांनाच या मित्राने झटका दिला आहे.

इराण आणि इस्त्राईलमध्ये शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर आता ट्रम्प यांची मोठे विधान समोर आले आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रामख्याने इस्त्राईलवर आगपाखड केली आहे. शस्त्रसंधीनंतर इस्त्राईलने लगेच हल्ला करायला नको होते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

संतापलेल्या ट्रम्प यांनी म्हटले की, इस्त्रायल, त्या बॉम्ब टाकू नका. तुम्ही असे केले तर हे खूप मोठे उल्लंघन असेल. तुमच्या वैमानिकांना परत बोलवा. इस्त्राईलने शस्त्रसंधीसाठी सहमती दाखवून लगेच हल्ला करणे, मला आवडलेले नाही, अशी नाराजी ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. त्याआधी इस्त्राईलनेच इराणकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचा आरोप केला होता. अशावेळी ट्रम्प यांच्या या विधानामुळे इस्त्राईल उघडे पडले आहे.

इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे आरोप फेटाळून लावले होते. इराणबाबतही ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराण कधीही त्यांचा आण्विक कार्यक्रम पुन्हा सुरू करणार नाही. मी इराणविषयी खूष नाही. पण इस्त्राईलबाबतही खूप नाखूश आहे, अशी नाराजी ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी कतारचे अमीर यांच्याशी दुरध्वनीवरून संवाद साधला होता. इराणला शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारण्यास सांगण्याबाबत ट्रम्प यांनी विनंती केली होती. त्यानतंर कतारच्या पंतप्रधानांनी इराणच्या सहमतीसाठी प्रयत्न केले होते. विशेष म्हणजे त्याआधीच इराणनने कतारमधील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला केला होता.

दरम्यान, मागील आठवडाभर इराण आणि इस्त्राईलमध्ये टोकाचा संघर्ष सुरू होता. एकमेकांवर जोरदार हल्ले-प्रतिहल्ले सुरू होते. यामध्ये आतापर्यंत दोन्ही देशांतील शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. या संघर्षामुळे कच्चा तेलाच्या किंमतीही भडकल्या होत्या. शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर जगाला दिलासा मिळाला होता. पण पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या दाव्यामुळे संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT