US President Donald Trump is escorted off stage by United States Secret Service agents after a reported shooting scare during the White House event. Sarkarnama
देश

Donald Trump Shooting : जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला; थेट व्हाईट हाऊसमध्ये घुसून गोळीबार

Donald Trump Attack Attempt : सुरक्षा यंत्रणांच्या कानावर गोळीबाराचा आवाज पडताच, अमेरिकेच्या 'सीक्रेट सर्व्हिस'ने तात्काळ सूत्रे हाती घेतली. धोक्याचा इशारा देत, एजंट्सनी ट्रम्प यांना मंचावरून वेगाने बाजूला केले आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Jagdish Patil

Donald Trump Attack Attempt : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्ट्स डिनर' दरम्यान गोळीबाराच्या घटना घडली आहे. या घटनेमुळे राजधानी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये एकच गोंधळ उडाला आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यानच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक मंचावरून बाजूला नेण्यात आले आणि एका सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

वृत्तानुसार, सुरक्षा यंत्रणांच्या कानावर गोळीबाराचा आवाज पडताच, अमेरिकेच्या 'सीक्रेट सर्व्हिस'ने तात्काळ सूत्रे हाती घेतली. धोक्याचा इशारा देत, एजंट्सनी ट्रम्प यांना मंचावरून वेगाने बाजूला केले आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर नेले.

उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यही त्यांच्यासोबत उपस्थित होते; त्यांनाही त्याचप्रमाणे तात्काळ एका सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.

गोळीबाराच्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये गोळीबार ट्रम्प यांच्या अगदी समोर होताना दिसत येत आहे. गोळीबार अचानक सुरू झाला तेव्हा ट्रम्प मंचावर बसले होते. गोळीबाराचा आवाज येताच सुरक्षा जवांनी त्यांना तात्काळ घेरले आणि त्यांना टेबलखाली लपवलं.

तर या डिनरसाठी 2600 जणांना निमंत्रण देण्यात आलं होतं. गोळीबारानंतर सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ कारवाई करत हॉटेल रिकामे केलं. दरम्यान संशयित हल्लेखोराला घटनास्थळीच अटक करण्यात आली आहे.

तर या हल्ल्याची माहिती खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे. त्यांनी सांगितलं की, "आज संध्याकाळी डीसीमध्ये खूप धावपळ घडली. सिक्रेट सर्व्हिस आणि सुरक्षा यंत्रणांनी उत्कृष्ट काम केल्याच पाहिला मिळालं. गोळीबारा दरम्यान त्यांनी मोठे शौर्य आणि चपळाई दाखवली.

गोळीबार करणाऱ्याला पकडण्यात आलं आहे. मी कार्यक्रम सुरू ठेवण्याची विनंती केली होती, पण पुढील निर्णय पूर्णपणे सुरक्षा यंत्रणांच्या निर्णयावर अवलंबून असतो. मात्र, आजची संध्याकाळ अपेक्षेप्रमाणे नव्हती आणि आम्हाला तो कार्यक्रम पुन्हा आयोजित करावा लागेल.", असं ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. दरम्या हा हल्ल्यामागचा उद्देश नेमका काय होता? या बाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT