

कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल, मंत्रिमंडळ फेरबदल आणि गटबाजीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण आले आहे.
पोटनिवडणुकीनंतर पक्षात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
karnataka congress cabinet reshuffle speculation : विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका सुरू असतानाच कर्नाटक काँग्रेसमध्ये गटबाजी, ‘डिनर मीटिंग’ आणि नवी दिल्ली दौरे पुन्हा चर्चेत आले आहेत. राज्यातील पोटनिवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेतृत्व बदल, प्रदेश अध्यक्षपदातील फेरबदल आणि मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या मुद्द्यांमुळे पक्षात हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी गुरुवारी निकटवर्तीय मंत्र्यांसोबत डिनर बैठक घेतली, तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चा करत आहेत. या घडामोडींना पक्षातील संभाव्य राजकीय बदलांचे संकेत मानले जात आहे.
दावणगिरी दक्षिण आणि बागलकोट विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका संपल्यानंतर काँग्रेसच्या २० हून अधिक वरिष्ठ आमदारांनी दिल्ली गाठून काही दिवस मुक्काम केला. त्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाची मागणी पक्षश्रेष्ठींसमोर मांडली होती.
मात्र, या मागणीवर शिवकुमार गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. नेतृत्व बदलाचा निर्णय होईपर्यंत मंत्रिमंडळ फेरबदल करू नये, असा दबाव त्यांनी पक्षश्रेष्ठींवर आणल्याची माहिती आहे. शिवकुमार यांनी बंगळुरात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर लवकर निर्णय घेण्याची मागणी केली होती.
सिध्दरामय्या यांनी बंगळुरातील अलीअस्कर रोडवरील मंत्री भैराती सुरेश यांच्या निवासस्थानी निकटवर्तीय मंत्र्यांसोबत डिनर बैठक घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदल, केपीसीसी अध्यक्षपद आणि शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्यासह विविध राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला जी. परमेश्वर, जमीर अहमद खान आणि एच. सी. महादेवाप्पा यांसह इतर मंत्री उपस्थित होते.
दरम्यान, शिवकुमार दिल्लीमध्ये मुक्काम ठोकून पक्षश्रेष्ठींशी सातत्याने चर्चा करत आहेत. हैदराबादमधील कार्यक्रमानंतर ते थेट दिल्लीला पोहोचले आहेत. कर्नाटक काँग्रेसमधील सध्याच्या घडामोडी आगामी मोठ्या राजकीय बदलांची नांदी मानल्या जात आहेत. चार मेनंतर पक्षात हालचाली अधिक वेगाने होतील आणि मे महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पक्षश्रेष्ठी नेतृत्व बदल, मंत्रिमंडळ फेरबदल आणि केपीसीसी अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
1. कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होणार का?
सध्या चर्चा सुरू असून अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही.
2. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार दिल्लीला का गेले?
पक्षश्रेष्ठींशी चर्चा आणि अंतर्गत मतभेद सोडवण्यासाठी त्यांनी दिल्ली दौरा केला.
3. डिनर मीटिंगचा उद्देश काय होता?
राजकीय रणनीती आणि पक्षातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती.
4. मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता आहे का?
हो, पक्षातील हालचाली पाहता फेरबदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
5. पोटनिवडणुकीचा काँग्रेसवर काय परिणाम झाला?
निकालानंतर पक्षातील अंतर्गत राजकारण अधिक तीव्र झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.