Donald Trump Sarkarnama
देश

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची टॅरिफ पॉलिसी उलटली? न घाबरता 88 देशांनी केला अमेरिकेचाच गेम; महत्वाची सेवाच केली ठप्प

Impact of Trump Tariffs on Global Economy: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांची जगात चर्चा सुरू आहे. पण याचा आता उलटा फटका अमेरिकेलाच बसताना दिसत आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात मोठे टॅरिफ लादले आहेत.

  2. भारतावर 50% टॅरिफ लादण्यात आले आहे.

  3. ट्रम्प यांच्या या धोरणाचा परिणाम जागतिक व्यापारावर होत आहे.

  4. 88 देशांनी अमेरिकेच्या टॅरिफविरोधात टपाल सेवा बंद केली आहे.

  5. याचा थेट परिणाम अमेरिकन नागरिकांवर होत आहे.

Donald Trump News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे ट्रम्प यांच्या टॅरिफची. आतापर्यंत ट्रम्प यांनी जगभरातील विविध देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ म्हणजेच आयातशुल्क लादला आहे.

भारतावर देखील ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लादला आहे. या दरम्यान ट्रम्प आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची समोर आले होते. ते अमेरिकेत आयात होणाऱ्या औषधांवर देखील 200 टक्के टॅरिफ लावण्याचा विचार करत आहेत. यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.

अशातच आता जगभरातील 88 देशांनी अमेरिकेचा गेम करण्याकडे पावले टाकली असून त्याचा फटका अमेरिकेला बसत आहे. अनेक देशांनी अमेरिकेच्या टॅरिफमुळे टपाल वाहतूकच बंद केली आहे. यामुळे याचा परिणाम अमेरिकन नागरिकांवर होताना दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर टॅरिफ लादत खळबळ उडवून दिली होती. भारतावर देखील आधी 25 टक्के आणि त्यानंतर पुन्हा 25 टक्के असा कर लादला. हे फक्त रशियाकडून खनिज तेल खरीदण्याच्या मुद्द्यावर अमेरिकेनं केलं. यामुळे भारतासह विविध देशांतून होणाऱ्या व्यापारावर याचा परिणाम होत आहे.

सर्वात मोठा फटका हा आता अमेरिकेला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय टपाल सेवांवर झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अमेरिकेला जाणारी टपाल वाहतूक 80 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. ही माहिती युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) ने दिली आहे. यामुळे जेवढे इतर देशांचे नुकसान होत आहे. तेवढाच अमेरिकन नागरिकांवर परिणाम होताना दिसत आहे.

अमेरिकेनं लादलेल्या करामुळे जगभरातील 88 देशांमधील टपाल सेवांवर परिणाम झाला आहे. यामुळे येथून होणारी टपाल सेवा काही काळासाठी किंवा कायमच्या स्थगित करण्यात आल्या आहेत. सुरुवातील अमेरिकेने लहान वस्तूंवर सूट दिली होती. मात्र 29 ऑगस्टपासून सर्व टपाल सेवांवर टॅरिफ लादण्याचे धोरण ट्रम्प यांच्या सरकारने घेतले. तशी घोषणाच ट्रम्प यांनी केली. यामुळे आंतरराष्ट्रीय टपाल सेवा विस्कळीत झालीय.

दरम्यान जर्मन ड्यूश पोस्ट, ब्रिटनची रॉयल मेल आणि बोस्निया या देशांनी आपली टपाल सेवा बंद केली आहे. यादेशांसह हर्जेगोव्हिनाने देखील अमेरिकेला जाणारे पार्सल घेणे बंद केले आहे. भारत, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इटली आणि जपानसारख्या देशांनी तर अमेरिकेला पाठवणाऱ्या पार्सलवर बंदीच घातली आहे.

टपाल सेवेत 81 टक्क्यांची घट

युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) ने दिलेल्या माहितीनुसार 29 ऑगस्टच्या आधी टपाल सेवा चांगली होती. मात्र त्यानंतर यात 81 टक्क्यांनी घट झाली आहे. तर 88 देशांमधील टपाल ऑपरेटर्सनी आपण टॅरिफवर तोडगा निघेपर्यंत अमेरिकेला जाणारी टपाल सेवा देणार नसल्याचे सांगितले आहे. याचा आता आंतरराष्ट्रीय व्यापारासह खाजगी ग्राहकांना फटका बसताना दिसत आहे.

दरम्यान या निर्णयामुळे अमेरिकन नागरीकांना त्रास सहन करावा लागत असल्याने युनिव्हर्सल पोस्टल युनियनकडून तोगडा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. UPU चे महासंचालक मासाहिको मेटोकी यावर प्रतिक्रिया देताना, जगभरातून अमेरिकेला पुन्हा टपाल सेवा सुरळीत सुरू व्हावी यासाठी UPU जलद तांत्रिक उपाय शोधत आहे. पण नियमित टपाल सेवा कधी सुरू होईल हे सध्या सांगता येत नाही.

काय आहे UPU

UPU म्हणजेच युनिव्हर्सल पोस्टल युनियन ही स्वित्झर्लंडमधील बर्न मधील एक संस्था आहे. ज्याची स्थापना 1874 मध्ये झाली होती. या संस्थेत 192 देशांचा सहभाग असून जी आंतरराष्ट्रीय टपाल सेवांसाठी नियम बनवते. याच नियमांच्या नुसार सदस्य देशांमध्ये टपाल सेवा सुरू राहते. पण आता 88 देशांनी अमेरिकेत टपाल पाठवण्याचे काम थांबवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT