Donald Trump Sarkarnama
देश

Donald Trump: ट्रम्प सरकार 30 दिवसात पडणार; जनता नाराज; कोर्टात आव्हान

Donald Trump Government May Fall in 30 Days: देशाची जनता ट्रम्प सरकारला कंटाळली आहे. सरकारने घेतलेले अनेक निर्णय जनतेच्या हिताचे नाहीत. हे सरकार महिनाभरात सत्तेवरुन खाली येईल.

Mangesh Mahale

Washington News: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)दुसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. त्याला आता एक महिना पूर्ण झाला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेची सुत्रे हातात घेताच अनेक निर्णयांचा धडाका सुरु ठेवला आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवली दिली आहे. त्यांच्या निर्णयाचा भारताला देखील फटका बसला आहे. महिनाभरात त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णय हे त्यांनी निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आहे.

त्यांच्या काही निर्णयांना अमेरिकेच्या कोर्टात आव्हान देखील देण्यात आले आहे. अशातच आता ट्रम्प सरकारबाबत डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांनी मोठा डावा केला आहे. येत्या 30 दिवसात ट्रम्प सरकार पडणार, असल्याचा दावा डेमोक्रेटिक रणनीतिकार जेम्स कार्विल यांनी केला आहे. (Trump administration collapse)

देशाची जनता ट्रम्प सरकारला कंटाळली आहे. सरकारने घेतलेले अनेक निर्णय जनतेच्या हिताचे नाहीत. त्यामुळे हे सरकार महिनाभरात सत्तेवरुन खाली येईल, असे जेम्स कार्विल यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर महिनाभरात घेतलेले अनेक निर्णयामुळे अमेरिकन जनतेची चिंता वाढली आहे. एलन मस्क सारख्या व्यक्तीला प्रशासनाचा एक भाग केल्याने देशातील अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

जेम्स कार्विल यांचा दावा ट्रम्प यांनी खोडून काढला आहे. "मी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या मताधिक्यानं जिंकलो आहे. सर्व सातही राज्यातील मतदारांनी मला कौल दिला आहे. सर्व राज्यात रिपब्लिकन पक्षाला यश मिळाले आहे. ते एक रेकॉर्ड आहे. आमच्याकडे पुरेशे संख्याबळ आहे," असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT