Shiv Sena News: मर्सिडिज नव्हे तर आदुबाळाची बाबागाडी सुद्धा BMC च्या टक्क्यांमधून येत होती?

नीलमताईंनी मातोश्रीची काळी बाजू उजेडात आणल्याने बीएमसीचे 'टक्कापुरुष' उद्धव ठाकरे यांना भलताच धक्का बसला आहे.
Jyoti Waghmare
Jyoti WaghmareSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्राचं राजकारण सध्या 'मर्सिडिज' मधून धावत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत दोन्ही शिवसेनेतील शिवसैनिक एकमेकांवर तुटून पडत आहेत, त्याला निमित्त आहे ते नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाचं.

नीलमताईंना प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटातील 'वाघिणी'सरसावल्या आहेत, तर दुसरीकडे शिंदे गटातील 'वाघिणी'त्याला सडेतोड उत्तर देत आहेत. नीलमताईंना विरोध करण्यासाठी ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी 'मातोश्री'वर बैठक सुरु असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा.डॉ. ज्योती वाघमारेंनी 'मातोश्री'विरोधात 'डरकाळी' फोडली आहे.

नीलमताईंनी मातोश्रीची काळी बाजू उजेडात आणल्याने बीएमसीचे 'टक्कापुरुष' उद्धव ठाकरे यांना भलताच धक्का बसला आहे. मर्सिडिज गाडीच नव्हे तर आदुबाळाची बाबागाडी सुद्धा BMC च्या टक्क्यांमधून येत होती हे खरे आहे का? असा सवाल ज्योतीताईंनी केला आहे.

Jyoti Waghmare
Sanjay Raut: उद्धव ठाकरेंवर चिखलफेक होत असताना शरद पवार गप्प कसे राहू शकतात?

गाडीच नव्हे तर 'मातोश्री-2' ची माडी, मोठे मन नसतानाही मोठ्या काठाच्या साड्या नेसणाऱ्या वहिनींची रेशमी साडी सुद्धा पदाधिकाऱ्यांकडून खंडण्या गोळा करून घेतली जात होती, हे जुन्या लोकांकडून आम्ही ऐकलंय. महाराष्ट्रात ऊन वाढले की गुलाबी थंडीची मजा घ्यायला तुम्ही जाता त्या लंडनमधल्या प्रॉपर्ट्या कशा झाल्या हे महाराष्ट्राला सांगणार का? असा प्रश्न वाघमारेंनी विचारला आहे.

Jyoti Waghmare
Sanjay Raut: नीलम गोऱ्हे निर्लज्ज बाई; राऊतांचा हल्लाबोल; 'राजकीय कुंडली'च मांडली... VIDIO पाहा

शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केलेले प्रश्न

  1. वयाच्या तिशीतच कोणतीही नोकरी उद्योग न करता आदित्य ठाकरेंकडे कोटवधीची मालमत्ता कशी आली, याचा हिशेब जनतेला देणार का?

  2. राणेसाहेब म्हणतात तुम्ही 'लेना' बँक आहात, राजसाहेब म्हणतात तुम्हाला 'खोके'नाही 'कंटेनर' लागतात.

  3. तुम्ही अन् तुमची लेकरे ज्या महागड्या परदेशी बनावटीच्या गाड्या उडवता त्या नक्की कोणाच्या नावावर आहेत याचा खुलासा करणार का?

  4. थिएटरच्या बाहेर सिनेमाच्या तिकिटं विकावीत तशी तिकिटांची दलाली उबाठामध्ये चालते, असा आरोप अनेकांनी केला आहे, यातील सत्य कधी सांगणार..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com