Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. पहिल्या कार्यकाळानंतर झालेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ट्रम्प यांची सत्तेतील वापसी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. ट्रम्प निवडणुकीच्या मैदानात उतरण्याआधी मोठे उद्योजक होते. त्यांचा व्यवसाय रिअस इस्टेट ते मीडिया टेक्नॉलजीपर्यंत विस्तारलेला आहे. जाणून घेऊयात ट्रम्प यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे.
डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी 2016मध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची घोषणा केली होती. त्यावेळी ट्रम्प यांची संपत्ती 4.5अब्ज डॉलरवर होती. तर राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ट्रम्प यांची संपत्ती होती. तर राष्ट्रपती बनल्यानंतर ट्रम्प यांची संपत्ती घटली होती. ही 2020मध्ये 4.5अब्ज डॉलरवरून घटून 2.1अब्ज डॉलरवर आली होती. तर राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ट्रम्प यांच्या संपत्ती पुन्हा वाढ दिसून आली.
ट्रम यांची नेटवर्थ 2022मध्ये 3 आणि नोव्हेंबर 2024 पर्यंत 7 अब्ज डॉलरच्या पार पोहचली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार नोव्हेंबर 2024मध्ये ट्रम्प यांची नेटवर्थ 7.7 अब्ज डॉलर होती. याचा अर्थ असा आहे की जवळपास 64,855 कोटी रुपये.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेटवर्थमध्ये सर्वात मोठा भाग ट्रम्प मीडिया अॅण्ड टेक्नॉलजी ग्रुपचा आहे. त्यांचेकडे अनेक गोल्फ क्लब, रिसॉर्ट आणि बंगले देखील आहेत. ट्रम्प यांना रिअर इस्टेट व्यवसाय वारशाने मिळालेला आहे. त्यांचे वडील फ्रेड ट्रम्प न्यूयॉर्कचे सर्वात यशस्वी रिअल इस्टेट व्यावसायिक म्हणून ओळखले जात होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 1971मध्ये आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळला आणि त्याला वेगाने पुढे वाढवलं. त्यांनी तमाम अलीशना इमारती बनवल्या. यामध्ये ट्रम्प पॅलेस, ट्रम्प वर्ल्ड टॉवर, ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल अॅण्ड रिसॉर्टचा समावेश आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतातही अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. येथे दोन ट्रम्प टॉवर तयार झाले आहेत. एक पुण्यात आणि दुसरे मुंबईत(Mumbai) आहे. तर गुरुग्राम आणि कोलकातामध्ये दोन नवीन ट्रम्प टॉवर तयार होत आहेत. आता भारतात किमान चार ट्रम्प टॉवर बनण्याची योजना आहे. यामुळे भारत ट्रम्प ब्रॅण्डसाठी सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपैकी एक बनेल.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.