US President Trump Oath Ceremony : 20 जानेवारीलाच का असतो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी, काय आहे या दिवसाचा इतिहास?

History of US President Oath Ceremony : जाणून घ्या, अमेरिकेच्या इतिहासात 20 जानेवारीच्या शपथविधी सोहळ्याची परंपरा कधी सुरू झाली?
Trump Oath Ceremony
Trump Oath CeremonySarkarnama
Published on
Updated on

US President Oath Ceremony and 20 January : डोनाल्ड ट्रम्प आज(सोमवार) म्हणजे 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक देशातील प्रमुख मान्यवर वॉशिंग्टन डीसी येथे पोहचत आहेत. 20 जानेवारी हा दिवस अमेरिकेसाठी अतिशय खास असतो. प्रत्येक चार वर्षांनी होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर या तारखेला अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष शपथ घेतात. जाणून घ्या, या दिवसाच काय आहे महत्त्व आणि ही परंपरा कधीपासून सुरू आहे?

अमेरिकेत(America) प्रत्येक चार वर्षाने नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक होते आणि 20 जानेवारी रोजी नवीन राष्ट्राध्यक्ष शपथ घेतात. जर या दिवशी रविवार असेल तर राष्ट्राध्यक्ष एका छोटेखानी समारंभात शपथ घेतात आणि पुढच्या दिवशी सार्वजनिक समारोहाचे आयोजन केले जाते. मात्र कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रपतींचा शपथविधी 20 जानेवारी रोजीच होतो. अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, अखेर 20 जानेवारी हा दिवसच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधीसाठी का ठरवलेला आहे?. जाणून घेऊयात या मागे काय आहे महत्त्वपूर्ण कारण आणि ही परंपरा अमेरिकेत कधीपासून चालत आली आहे.

पहिल्यांदा अमेरिकी संसदेत शपथविधी सोहळा -

डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) 20 जानेवारी रोजी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेचे नेतृत्व करणार आहेत. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी सोहळा भव्य होणार आहे. ज्यामध्ये जगभरातील अनेक देशांचे दिग्गज सहभागी होत आहेत. शपथविधी सोहळा यंदा अमेरिकी संसदेत कॅपिटल रोटुंडा हॉलमध्ये होईल. 40 वर्षानंतर अमेरिकेच्या इतिहासात असं होत आहे, जेव्हा एखाद्या राष्ट्राध्यक्षाचा शपथविधी बंदीस्त सभागृहात होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे हा निर्णय घेतला गेला आहे.

अमेरिकेत प्रत्येक नवीन राष्ट्राध्यक्ष 20 जानेवारी रोजीच शपथ घेतो आणि कार्यभार स्वीकारतो. मात्र 1933च्या आधी अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधीची तारीख वेगळी होती. नंतर 1933मध्ये नेब्रास्काचे सीनेटर जॉर्ज नॉरिस यांच्या पुढाकाराने घटनेत 20वे संशोधन केले गेले होते. यादिवसाला अमेरिकेत इनॉग्रेशन डे देखील संबोधले जाते. या दिवशी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्षही शपथ घेतात.

Trump Oath Ceremony
Donald Trump oath ceremony : डोनाल्ड ट्रम्प पहिल्याच दिवशी विक्रम करणार; 100 फायली तयार...

आधी शपथविधी कधी व्हायचा? -

अमेरिकेत 1933च्या आधीपर्यंत राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीची तारीख 20 जानेवारी ऐवजी 4 मार्च असायची. राष्ट्राध्यक्ष निवडीच्या जवळपास दोन महिन्यानंतर शपथविधी सोहळ्याचे आयोजन केले जात होते.1789मध्ये जेव्हा अमेरिकेचे संविधान अस्तित्वात आले, तेव्हापासून 4 मार्चची तारीख राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीसाठी निश्चित केली गेली होती. मात्र ही प्रक्रिया प्रदीर्घ आणि किचकट झाली होती.

Trump Oath Ceremony
Hyderabad Metro Video : धडधडतं हृदय अन् हैदराबाद मेट्रोने केली '13-13-13'ची कमाल; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

या परंपरेत कधी बदल झाला? -

निवडणुकीनंतर शपथविधी सोहळ्यातील मोठे अंतर 1933मध्ये दूर केले गेले. 1933मध्ये अमेरिकेच्या संविधानात 20वे संशोधन केले गेले. यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीची तारीख 4 मार्च ऐवजी 20 जानेवारी केली गेली. या संशोधनानंतर फ्रॅकलिन डी. रूसवेल्ट अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते, ज्यांनी 1933मध्ये 20 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com