Donald Trump Sarkarnama
देश

Donald Trump decision : ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय! आता ‘या’ १२ देशांतील लोकांना अमेरिकेत 'No Entry'

Donald Trump enforces a new travel ban affecting 12 countries : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सुरक्षेचा हवाला देत इतर सात देशांवर कडक निर्बंध लादले आहेत.

Mayur Ratnaparkhe

US President Trump New Travel Ban decision : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. मग त्यांचा टॅरिफबाबतच्या निर्णय़ असेल, अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांबाबतची कडक भूमिका असेल किंवा मग भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत त्यांनी घेतलेली भूमिका असेल. त्यानंतर आता ट्रम्प यांनी पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता जगभरातील १२ देशांमधील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंद केला आहे. या देशांमधील लोक आता अमेरिकेत प्रवास करू शकणार नाहीत. खरंतर ट्रम्प यांनी काही देशांच्या नागरिकांवर बंदी घालण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तर ट्रम्प यांनी आणखी सात देशांविरोधात कडक निर्णय घेतला आहे.

त्यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात अनेक देशांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली होती. परंतु नंतर ती काढून टाकण्यात आली. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांचे कठोर वर्तन दिसून येत आहे. ट्रम्प यांनी अनेक देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे.

याशिवाय, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सुरक्षेचा हवाला देत इतर सात देशांवर कडक निर्बंध लादले आहेत.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रात्री या संदर्भात घोषणा केली. त्यांनी एका घोषणेवर स्वाक्षरी केली आणि १२ देशांतील लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली. ही बंदी सोमवार, ९ जूनपासून लागू होईल.

 ट्रम्प यांनी ज्या देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे त्यात अफगाणिस्तान, बर्मा, चाड, काँगो प्रजासत्ताक, विषुववृत्तीय गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन यांचा समावेश आहे. तर ज्या सात देशांवर कडक निर्बंध लादले आहेत. यामध्ये बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे.

आपल्या या कठोर निर्णायानंतर ट्रम्प यांनी म्हटले की, "मला अमेरिका आणि त्याच्या लोकांच्या, राष्ट्रीय सुरक्षेचे व राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्यासाठी कृती करावी लागेल."  यापूर्वी ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी एक कार्यकारी आदेश दिला होता, ज्यामध्ये राज्य आणि गृह सुरक्षा विभाग आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालकांना अमेरिकेबद्दल शत्रूत्ववृत्ती असणाऱ्या देशांबद्दल अहवाल तयार करण्यास आणि काही देशांमधून येणारे लोक राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतात का हे शोधण्यास सांगितले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT