
Asim Munir’s Conflict with Imran Khan : पाकिस्तानातील आदियाला तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान यांचे म्हणणे आहे की, मी जेव्हा पंतप्रधान होतो तेव्हा मुनीर यांनी बुशरा बीबी यांना भेटण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला होता. मात्र अनेकदा पाठीमागे लागूनही बुशरा यांनी मुनीर यांना दाद दिली नाही.
इम्रान खान यांनी सोशल मीडियावर एक्स पोस्टद्वारे दावा केला आहे की, जनरल मुनीर यांनी डीजी आयएसआय पदावरून हटवलं गेल्यानंतर त्यांच्या पत्नीशी मध्यस्थांमार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माझ्या पत्नीने त्यांना भेटण्यास नकार दिला. बुशरा यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, मी कोणत्याही अधिकाऱ्याशी भेटत नाही. मला कोणत्याही अधिकाऱ्याशी काहीही देणेघेणे नाही.
इम्रान खान यांचे म्हणणे आहे की, बुशरा यांनी त्यावेळी मुनीर यांचे एकही म्हणणे ऐकले नाही, ज्याची किंमत त्यांना आता चुकावावी लागत आहे. बुशरा यांना मुनीरने सूड भावनेने तुरुंगात ठेवले आहे. १४ महिन्यांपासून बुशरा बीबी पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.
इम्रान खान म्हणतात की, बुशरा यांनी त्यावेळी मुनीरचे काहीही ऐकले नाही, ज्यामुळे त्या आता अडचणीत आहेत. मुनीरने सूड म्हणून बुशर यांना तुरुंगात ठेवले आहे. बुशरा बीबी १४ महिन्यांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
इम्रान खान यांच्या मते, तुरुंगात बुशरा यांना अमानुष वागणूक दिली जात आहे आणि हे सर्व मुनीर यांच्या इशाऱ्यावरून केले जात आहे. इम्रान खान यांनी बुशरा यांना एक गृहिणी आणि पाकिस्तानी नागरिक म्हटले आहे. एवढंच नाहीतर इम्रान खान यांनी असेही म्हटले आहे की, त्यांना त्यांच्या पत्नीलाही भेटू दिले जात नाही.
२०१८ मध्ये असीम मुनीरला पाकिस्तानमध्ये आयएसआय प्रमुखपद मिळाले होते, परंतु सत्तेत येताच इम्रान खान यांनी मुनीरवर फास घट्ट केला व इम्रान यांच्यामुळेच मुनीर यांची मुख्यालयात बदली करण्यात आली होती. त्यावेळी इम्रान खान यांनी आयएसआय प्रमुख पदाची जबाबदारी फैज अहमद यांच्याकडे सोपवली होती.
असे म्हटले जात आहे की यानंतर मुनीर यांनी इम्रान खान यांच्या पत्नीशी संपर्क स्थापित केला होता. तथापि, मुनीर यांची इम्रान खान यांच्याशी चर्चा यशस्वी झाली नाही. पुढे इम्रान खान हे सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर २०२२ मध्ये मुनीर यांना लष्करप्रमुखपद मिळाले आणि २०२५ मध्ये मुनीर यांना फील्ड मार्शल बनवण्यात आले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.