Greenland Election : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून काही देशांना अमेरिकेत सामावून घेण्याबाबत उघडपणे भाष्य केले होते. त्याला काही देशांनी कडाडून विरोध केला होता. तर त्या देशांतील काही राजकीय पक्षांकडून समर्थनही करण्यात आले होते. उत्तर अमेरिका खंडातील ग्रीनलँडबाबतही टॅम्प यांनी धमकीवजा इशारा दिला होता. तेथील कुलिक पक्षाने ट्रम्प यांचे समर्थन केले होते. याच पक्षाला निवडणुकीत मोठा दणका बसला आहे.
ग्रीनलँडमध्ये नुकतेच संसदीय निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीचे निकाल आता समोर आले असून ट्रम्प यांचा कट्टर विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. तर ट्रम्प समर्थक पक्षाला केवळ 1.1 टक्के मते मिळाली आहे. या निकालाने ट्रम्प यांच्या भूमिकेलाच धक्का दिला आहे. आपल्याला अमेरिकेत समाविष्ट व्हायचे नाही, असा संदेश तेथील नागरिकांनी दिला आहे.
डेमोक्रेटिक पक्षाला 29.9 टक्के मते मिळाली आहे. तर ग्रीनलँडमधील नालेराक या दुसऱ्या पक्षाला 24.5 टक्के मते मिळाली आहेत. विजयानंतर डेमोक्रेटिक पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जेन्स-फ्रेडरिक नीलस यांनी सांगितले की, लोकांना बदल हवा आहे. आम्ही आमच्या कल्याणासाठी अधिकाधिक व्यापार आणू इच्छितो. आम्हाला टप्प्याटप्याने स्वातंत्र्य हवे आहे. त्यासाठी एक मजबूत पाया तयार करू इच्छितो.
डेमोक्रेटिक पक्षाकडून इतर विरोधी पक्षांना सोबत घेत आघाडीचे सरकार स्थापन केले जाणार आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षाला 36 टक्के मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीत हा पक्षाला 66 टक्क्यांहून अधिक मते प्राप्त झाली होती. ग्रीनलँडमध्ये जवळपास 40 हजार लोक मतदानासाठी पात्र होते. अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या हा देश खनिज संपत्तीने समृध्द आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात ग्रीनलँडला अमेरिकेत सामावून घेण्याबाबत भाष्य केले होते. अमेरिकेचे सुरक्षेसाठी ग्रीनलँड आवश्यक असल्याचे सांगत त्याला विकत घेऊन अमेरिकेत समाविष्ट करू, असा धमकीवजा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. यापार्श्वभूमीवर डेमोक्रेटिक पक्षाचा विजय ट्रम्प यांच्या मनसुब्यांना धक्का मानला जात आहे. नीलसन यांनी ट्रम्प यांच्या विधानानंतर देशाच्या राजकीय स्वातंत्र्यालासाठी धोका असल्याचे म्हटले होते.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.