Kerala Love Jihad cases : ''केरळच्या 'या' तालुक्यात 400 मुली ठरल्या ‘लव्ह जिहाद’च्या बळी'' ; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ!

BJP leader PC George : जाणून घ्या, भाजप नेते पीसी जॉर्ज यांनी सामूहिक कार्यक्रमात आणखी काय म्हटलं आहे, शिवाय ख्रिश्चन समुदायाच्या लोकाना आवाहनही केलं आहे.
BJP leader PC George on Love Jihad
BJP leader PC George on Love JihadSarkarnama
Published on
Updated on

BJP on Love Jihad : द्वेषपूर्ण भाषण दिल्याप्रकरणी जामिनावर बाहेर आलेले भाजप नेते पीसी जॉर्ज यांनी केरळमध्ये ख्रिश्चन समुदायाच्या लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या मुलींचा विवाह कोणत्याही परिस्थितीत त्या 24 वर्षांच्या होईपर्यंत करावा.

भाजप(BJP) नेते जॉर्ज यांचा दावा आहे की राज्यात एकट्या मीनाचिल तालुक्यातच आतापर्यंत 400 पेक्षा अधिक मुली लव्ह जिहादच्या बळी ठरल्या आहेत. तर जॉर्ज यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात गत रविवारी पाला येथे आयोजित एका विशेष संमेलनात म्हटले की, मीनाचिल तालुक्यातून गायब होणाऱ्या मुलींमधून केवळ 41 मुलीच परतल्या आहेत. हेच नाहीतर शनिवारी एक मुलगी साडेनऊ वाजता घरातून गेली होती आणि तिचा शोध आतापर्यंत सुरू आहे.

BJP leader PC George on Love Jihad
Pakistan train hijack : आता बोला! पाकिस्तानात चक्क प्रवासी रेल्वेचंच झालं अपहरण ; 400 पेक्षा अधिक प्रवासी ओलीस

भाजप नेते जॉर्ज यांनी म्हटले की, ते विचारायचे आहे कीी, आपल्या मुलीला ती 25 वर्षांची होईपर्यंत अविवाहित ठेवल्याबद्दल त्या मुलीच्या वडिलास शिक्षा का केली जाऊ नये?, आता या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे.

BJP leader PC George on Love Jihad
Kanhaiya Kumar : निवडणुकीआधी बिहारमध्ये राजकारण तापलं ; कन्हैय्या कुमार सुरू करणार ''नोकरी दो, पलायन रोको'' यात्रा!

जॉर्ज यांनी म्हटले की, एका मुलीचा विवाह तिच्या वायच्या 22 किंवा 23व्या वर्षी केला गेला पाहिजे. जर तिचे वय 28-29 झाले, तर ती कमावू लागते आणि मग ती विवाह करत नाही. तिचे कुटुंबही तिच्या कमाईत भागीदार बनते. येथूनच समस्या सुरू होते.

त्यामुळेच आपल्या मुलींना मुस्लिमांच्या लव्ह जिहादच्या(Love Jihad) जाळ्यात अडकण्यापासून वाचवण्यासाठी त्यांचा विवाह वेळीच करावा. विशेष बाब म्हणजे ख्रिश्चन बहुल मीनाचिल तालुका सीरियन कॅथलिक लोकसंख्येचा प्रभाव असणारा आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com