Donald Trump  Sarkarnama
देश

Donald Trump News : कोर्टाच्या कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, 'हे षडयंत्र..; मी थांबणार नाही...'

Donald Trump Reaction : देशाचे रक्षण करणे हा एकमेव गुन्हा मी केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Donald Trump Reaction stormy daniels indictment hush money case : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल (मंगळवारी) मध्यरात्री अटक करण्यात आली होती.

एका पोर्न स्टारला गुप्तपणे पैसे दिल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ डिसेंबर रोजी होणार आहे.

गुन्हेगारी आरोपाचा सामना करणारे ते अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असतील. यासोबतच 2024 मध्ये पुन्हा व्हाईट हाऊस गाठण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावताना दिसत आहे. यावर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "येत्या निवडणुकीत मला पाडण्याचे हे षडयंत्र आहे. पण मी थांबणार नाही, पुन्हा उभा राहीन,"

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या अध्यक्षीय प्रचारादरम्यान प्रौढ चित्रपट अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिल्याच्या आरोपाशी संबंधित फौजदारी खटल्याच्या संदर्भात मंगळवारी मॅनहॅटन न्यायालयात हजर झाले. येथील न्यायालयात हजर होताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्यांना गेल्या आठवड्यात मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने दोषी ठरवले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आल्यानंतर वातावरणात तणाव निर्माण होऊ शकतं. ट्रम्प यांचे समर्थक आक्रमक होऊ शकतात, या पार्श्वभूमीवर मॅनहट्टन कोर्ट ते ट्रम्प टॉवरपर्यंत तब्बल 35 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली.

"आपला देश आपल्याला वाचवायचा आहे. अमेरिकेत असे काही घडू शकते असे मला कधीच वाटले नव्हते, निर्भयपणे माझ्या देशाचे रक्षण करणे हा एकमेव गुन्हा मी केला आहे. सध्या अमेरिकेची परिस्थिती वाईट आहे. माझ्याकडून चुकीचे घडले असे माझ्या विरोधकांनाही वाटते. अमेरिकेत माझ्यासोबत असे होऊ शकते याचे लोकांना आश्चर्य वाटते. माझ्यासोबत असे होईल असे वाटले नव्हते," असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्टॉर्मी डॅनियलचे आरोप

स्टॉर्मी डॅनियलने आरोप केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘द अँप्रेटिस’ या रिॲलिटी शोमध्ये काम देण्याचा बहाणा करून तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. ही गोष्ट लपवण्यासाठी ट्रम्प यांनी तिला पैसेही दिले.

स्टॉर्मीचा आरोप आहे की, ती २००६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेटली होती. यादरम्यान अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी तिला हॉटेलमधील खोलीत जेवणासाठी आमंत्रित केले होते. जेव्हा ती रुममध्ये गेली तेव्हा ट्रम्प यांनी तिच्यासोबत जवळीक साधली. आणि काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT