Donald Trump 
देश

Trump on EVM: ईव्हीएम अन् पोस्टल मतपत्रिका बंद करणार! ट्रम्प यांची मोठी घोषणा

Trump on EVM: यासाठी २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांपूर्वीच आपण एक आदेश पारित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Amit Ujagare

Trump on EVM: इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन या चुकीच्या आणि गंभीर स्वरुपाच्या वादग्रस्त मशिन्स असून या मशीन आणि पोस्टल मतदानाद्वारे करण्यात येणारी मतदान प्रक्रिया संपुष्टात आणण्यासाठी एका नव्या आंदोलनाची आपण सुरुवात आपण करणार आहोत, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यासाठी २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांपूर्वीच आपण एक आदेश पारित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

वॉटरमार्क पेपर जास्त वेगवान

ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी एका संदेशाद्वारे याची घोषणा केली आहे. यात त्यांनी म्हटलं की, मी पोस्टाद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मतपत्रिकांपासून सुटका करुन घेण्यासाठी एक आंदोलन चालवण्याचं नियोजन करत आहे. यासाठी आपण काम करणारच आहोत तर चुकीची, खर्चिक आणि गंभीर स्वरुपात वादात अडकलेल्या वोटिंग मशिन पासूनही सुटका करुन घेणार आहोत. या मशिनचा खर्च हा वॉटरमार्क पेपरपेक्षा दहा पट जास्त आहे. वॉटरमार्क पेपर हा वोटिंग मशिनपेक्षा जास्त वेगवान असून त्याचा निकालही सर्वाधिक अचूक असतात. तसंच कोण जिंकलं आणि कोण हारलं यावर यामुळं संशयच राहत नाही. वॉटरमार्क पेपरची वकिली करताना ट्रम्प यांनी म्हटलं की, निवडणुकांमध्ये वेगवान आणि अधिक विश्वसनीय निकालांसाठी केवळ वॉटरमार्क पेपरचाच वापर करायला हवा.

शिवाय देशाचं अस्तित्व नाही

ट्रम्प यांनी पुढे म्हटलं, "मी आणि माझा रिपब्लिकन पक्ष आपल्या निवडणुकांमध्ये इमानदारी आणि निष्ठा पुनर्पस्थापित करण्यासाठी जीवतोडून लढू. पोस्टल मतपत्रिकांमधून होणारी फसवणूक, वोटिंग मशिन्सचा वापर हे पूर्णपणे एक संकट आहे. हे संकट आता संपुष्टात आलं पाहिजे. लक्षात ठेवा, निष्पक्ष आणि प्रामाणिक निवडणुका, मजबूत आणि शक्तीशाली सीमांशिवाय तुमच्याजवळ देशाचं अस्तित्व पण शिल्लक राहणार नाही"

ट्रम्प यांच्याकडून पुतीन यांचं कौतुक

१५ ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये पुतीन यांच्याशी तब्बल तीन तास बैठक पार पडल्यानंतर फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प यांनी म्हटलं की, "ब्लादिमिर पुतीन हे एक स्मार्ट व्यक्ती आहेत. त्यांनी म्हटलं होतं की, पोस्टल मतदानाद्वारे निष्पक्ष निवडणूक होऊ शकत नाही. जगात आता असा कुठलाही देश नाही जो याचा वापर करत असेल". पण याचा विरोधाभास असा की, ट्रम्प यांनी स्वतः गेल्या काही निवडणुकांमध्ये पोस्टल मतदान केलं आहे. तसंच २०२४ मध्ये त्यांनी आपल्या समर्थकांना देखील पोस्टल मतदान करण्याचं आवाहन केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT