AI Image Sarkarnama
देश

Donald Trump : ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसणार? अभद्र भाषेनंतर संताप वाढला, संविधानातील एक कलम ठरणार कारणीभूत

Donald Trump removal 25th amendment : डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार क्रिस मर्फी यांनी सोशल मीडियात डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतीत पोस्ट केली आहे.

Rajanand More

Iran war impact : इराण युध्दामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बिथरल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. काहीही केल्या इराण हार मानण्यास तयार नसल्याने ट्रम्प वारंवार निर्वाणीचा इशारा देत आहेत. हल्लांचा जोर वाढवत आहेत. पण तरीही इराण माघार घेत नाही. त्यातच होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल वाहतूक बंद करत इराणने अमेरिकेसह अनेक देशांचे नाक दाबले आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाल्याने ट्रम्प यांच्याविरोधातील संताप वाढू लागला आहे. त्यामुळे भडकलेल्या ट्रम्प यांनी रविवारी इराणविषयी अत्यंत अभद्र भाषेचा वापर केला. सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये अश्लील शब्दांचा वापर करत त्यांनी इराणला धमकावले. होर्मूझ सामुद्रधुनी खुली केली नाही तर मंगळवारी ऊर्जा प्रकल्प व पुलांवर हल्ले करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

ट्रम्प यांनी एखाद्या देशाविषयी अशी भाषा वापरल्याने जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकेतूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता उघडपणे ट्रम्प यांना पदावरून हटविण्याची मागणी होऊ लागली आहे. संविधानातील २५ व्या दुरूस्तीतील कलम चारनुसार काँग्रेसमध्ये प्रस्ताव आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार क्रिस मर्फी यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. मी ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये असतो तर २५ व्या संशोधनाबाबत चर्चा केली असती. ट्रम्प यांचा हा वेडेपणा असल्याचेही मर्फी म्हणाले. एमएसएनबीसीचे माजी सुत्रसंचालक मेहदी हसन यांनीही सोशल मीडियात पोस्ट करत उपराष्ट्रपती आणि कॅबिनेटने तातडीने २५ व्या संशोधनातील कलम चार लागू करावे, अशी मागणी केली.

काय आहे २५ वे संशोधन?

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जॉन एफ. केनेडी यांची १९६७ मध्ये हत्या झाल्यानंतर संविधानात २५ वी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रपतींचा मृत्यू झाल्यास, राजीनामा दिल्यास किंवा त्यांना पदावरून हटविले किंवा ते अक्षम ठरल्यास उपराष्ट्रपतींकडे सत्ता सोपविण्याची प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये एकूण चार कलमे आहेत. त्यापैकी चौथे कलम ट्रम्प यांना हटविण्यासाठी वापरता येऊ शकते. 

इराण युध्दानंतर ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत प्रचंड रोष वाढला आहे. विरोधी डेमोक्रेटिक पक्षासह सत्ताधारी पक्षाचे खासदार, नेतेही ट्रम्प यांच्यावर प्रचंड नाराज झाले आहे. अनेक जण त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. इराणबाबतची भूमिका ट्रम्प सातत्याने बदलत आहेत. त्यातच त्यांनी अश्लील भाषा वापरल्याने संतापात आणखी भर पडली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT