Donald Trump Sarkarnama
देश

Donald Trump : रायफल अन् 400 मीटरवरून गोळीबार, ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा हल्ला; पण...

Donald Trump Golf Club Shooting : डोनाल्ड ट्रम्प हे फ्लोरिडातील वेस्ट पाम बीच येथील गोल्फ कोर्स येथे गोल्फ खेळत होते. तेव्हा, ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला आहे. मात्र...

Akshay Sabale

Donald Trump Assassination Attempt: अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोन महिन्यांच्या काळातील ट्रम्प यांच्यावर हा दुसरा हल्ला आहे. ट्रम्प गोल्फ खेळत असताना अचानक गोळीबार झाला. मात्र, ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे फ्लोरिडातील वेस्ट पाम बीच येथील गोल्फ कोर्स येथे गोल्फ खेळत होते. तेव्हा, झुडपात लपलेल्या बंदूकधाऱ्यानं रायफलमधून ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला.

बंदूकधारी ट्रम्प यांच्यापासून फक्त 400 ते 500 मीटर अंतरावर होता. या हल्ल्यात ट्रम्प एकदम सुरक्षित आहेत. मात्र, ज्या हल्लेखोरानं ट्रम्प यांच्यावर बंदूक रोखली होती, त्याच्यावर सिक्रेट सर्व्हिसच्या जवानानं गोळीबार केला होता.

हल्लेखोराला घटनेनंतर तात्काळ अटक केली आहे. रयान वेस्ले (58) असं हल्लोखोराचं नाव आहे. रयान हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. तो सध्या हवाई प्रांत येथे राहतो.

रयान (Ryan Wesley Routh) हा मूळचा नॉर्थ कॅरोलिना येथील रहिवाशी आहे. त्याला ड्रग्ज बाळगणे, परवाना आणि विम्याशिवाय गाडी न चालवणे या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यासह रयान हा युक्रेनचा समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे.

हिंसेसाठी जागा नाही...

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यावर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार कमला हॅरिस यांनी 'एक्स' अकाउंटवर ट्विट केलं आहे. "फ्लोरिडात माजी राष्ट्रपती ट्रम्प यांच्यावर गोळीबाराची घटना माझ्या ऐकण्यात आली. मात्र, ट्रम्प सुरक्षित असल्याचं ऐकून मला बरं वाटले. अमेरिकेत हिंसेसाठी कुठलीही जागा नाही," असं कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी म्हटलं आहे.

14 जुलैला हल्ला...

14 जुलैला प्रचारवेळी ट्रम्प यांच्यावर 20 वर्षीय हल्लेखोरानं एआर-15 सेमी-ऑटोमेटिक रायफलमधून हल्ला केला होता. यात ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेली होती. हल्लेखोरानं एकून 10 गोळ्या चालवल्या होत्या. त्यामध्ये एकजणाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले होते. तर, सिक्रेट सर्व्हिसच्या जवावांनी हल्लोखोराला गोळीबारात ठार मारलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT