Donald Trump : ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराण अन् पाकिस्ताननं रचला कट?

The mastermind behind the attack on Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांचा भांडापोड झाला आहे. तर अमेरिकेतील दिग्गज नेत्यांच्या हत्या घडवून आणण्याचा कट इराणमध्ये रचण्यात आल्याचंही समोर आलं आहे.
Donald Trump
Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

Donald Trump News : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांचा भांडापोड झाला आहे. अमेरिकेतील दिग्गज नेत्यांच्या हत्या घडवून आणण्याचा कट इराणमध्ये रचण्यात आला होता आणि या हत्या करण्याचं काम पाकिस्तानमधील एका व्यक्तीला देण्यात आल्याचं समोर आलं आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने या हायप्रोफाईल हत्येचा कट रचल्या प्रकरणी आसिफ मर्चंट या 46 वर्षीय पाकिस्तानी व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर या नेत्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी हे सर्व षडयंत्र इराणचं असल्याचं म्हटलं आहे.

न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, मर्चंट एका महत्वाच्या कामासाठी पाकिस्तानातून (Pakistan) अमेरिकेला गेला होता. मात्र, तिथे जायच्या आधी तो काही काळ इराणमध्ये थांबला. तो जूनमध्ये न्यूयॉर्कला गेला, यावेळी त्याला हायप्रोफाईल व्यक्तींची हत्या करण्याची सुपारी घेणाऱ्यांना भेटायचं होतं. यासाठी आसिफने दोन व्यक्तींना तब्बल 5000 डॉलर्सही दिले होते. मात्र ज्यांना सुपारी दिली ते प्रत्यक्षात गुप्तहेर होते.

तर या सर्व घडामोडीनंतर आसिफने अमेरिकेतून (America) निघण्याचा प्रयत्न करताच त्याला अटक केली. मात्र, त्याने जाण्यापूर्वी ज्यांना सुपारी दिली होती त्यांना सांगितलं होतं की, पाकिस्तानात पोहोचल्यानंतरच ज्यांची हत्या करायची आहे त्यांची नावे सांगितली जातील. सूत्रांच्या माहितीनुसार, न्याय विभागाने आसिफवर आरोप करताना ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र, ज्या लोकांची सुपारी दिली होती त्यामध्ये ट्रम्प यांचा समावेश असल्याचं म्हटलं आहे.

Donald Trump
Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र,पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक; म्हणाले, ' तू चॅम्पियन...'

दरम्यान, ट्रम्प यांच्या हत्येचा इराणचा कट असल्याची माहिती अमेरिकन प्रशासनाला समजताच त्यांनी ट्रम्प यांची सुरक्षा वाढवली. तर अहवालात न्यायालयाच्या कागदपत्रांचा पुरावा देत सांगितलं आहे की, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे सर्वोच्च कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आसिफ मर्चंटने 2020 मध्ये अमेरिकन नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता.

Donald Trump
Video Uddhav Thackeray : "पापा को बोलो वॉर रूकवा दो", बांगलादेशवरून ठाकरेंनी मोदींना डिवचलं

ट्रम्प यांच्यावर गोळीबार

मागील महिन्यात अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना असताना अचानक गोळीबार झाला. या हल्ल्यात ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला एक गोळी लागली. त्यांच्या कानातून रक्त वाहू लागले, त्यानंतर सुरक्षा रक्षक आले आणि त्यांनी ट्रम्प यांना चारही बाजूंनी घेरले आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com