Donald Trump, Kamala Harris Sarkarnama
देश

Kamala Harris : निवडणुकीनंतर कमला हॅरिस यांचा पक्ष कंगाल; डोनाल्ड ट्रम्प सरसावले

Kamala Harris Democratic Party Millions Dollar Debt: निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी एक अब्ज डॉलर्स उभे करण्यात आले होते, परंतु आता पक्षावर दोन कोटी डॉलरचे कर्ज आहे.

Rashmi Mane

US Election 2024: अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवून डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. एक अब्ज डॉलर्सचा निधी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डेमोक्रॅटिक पक्ष आता लाखो डॉलर्सच्या कर्जात बुडाला आहे.

त्यामुळे अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी पक्षाची मदत देऊ केली आहे. एका वेबसाईटच्या अहवालानुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस (Kamala Harris) आणि टिम वॉल्झ यांच्या प्रचारासाठी एक अब्ज डॉलर्स उभे करण्यात आले होते, परंतु आता पक्षावर दोन कोटी डॉलरचे कर्ज आहे.

ट्रम्प (Donald Trump) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विक्रमी निवडणूक निधी जमा करणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाकडे आता काहीच उरले नाही, याचे मला आश्चर्य वाटते. त्याचे दायित्व वाढले आहे. विक्रेते व इतर लोक त्यांच्याकडून थकबाकीची मागणी करत आहेत. या कठीण काळात आम्ही जे काही करू शकतो ते करू.

ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाला मदतीची ऑफर दिली आणि सांगितले की या कठीण काळात आम्हाला मदत करायची आहे. आमच्याकडे खूप पैसा आहे. संपूर्ण प्रचार मोहिमेदरम्यान मीडियाने आम्हाला खूप मदत केली. यामुळे आम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नव्हती.

कर्जावरून डेमोक्रॅटिक पक्षात तेढ!

दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्षातूनही निषेधाचे आवाज उठू लागले आहेत. अनेक नेत्यांनी निवडणूक निधीच्या बेफिकीर वापरावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. असा दावा केला जात आहे की 16 ऑक्टोबरपर्यंत हॅरिसकडे $118 दशलक्ष निधी शिल्लक होता. एका माजी डेमोक्रॅटीक पक्षाने सांगितले की आम्ही मूर्खांसारखे पैसे खर्च केले. आमच्याकडे कोणतीही रणनीती नव्हती. कमला हॅरिस यांनी निवडणूक प्रचारासाठी सुमारे एक अब्ज डॉलर्सचा निधी जमा केला होता. पण आता डेमोक्रॅट पक्षावर दोन कोटी डॉलरचे कर्ज झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT