Pune News : गेल्या वर्षा जगात अनेक मोठ्या आणि धक्कादायक घटना घडल्या आहेत. यात हिंडनबर्ग कंपनी आणि इस्रायल हमास युद्धाचा समावेश आहे. पण आता इस्रायल हमास युद्धाला ब्रेक लागला असून युद्धबंदीवर दोन्ही देशांची सहमती झाली आहे. तसेच भारतातील अदाणी समूहावर गंबीर आरोप करणाऱ्या 'हिंडेनबर्ग'चा बाजार उठला असून हिंडनबर्ग रिसर्चला आता कुलूप लागणार आहे. यादोन्ही घटनांमागे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पॉवर आता दिसत आहे. ट्रम्प 20 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार असून याआधीच त्यांचा दबदबा दिसत आहे.
जवळपास दीड वर्ष इस्रायल-हमास युद्ध सुरू असून यामुळे जगाला झळ बसत आहे. अनेक देशांनी युद्धबंदीसाठी प्रयत्न करूनही यात यश आले नव्हते. पण आता या युद्धात नवा ट्वीस्ट आला असून दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष होणार असून त्यांच्या शपथविधीच ही युद्धबंदी झाली आहे. तसेच मध्य पूर्वेतील ओलितांच्या सुटकेबाबत एक करार देखील करण्यात आला आहे. यामुळे ओलितांची लवकरच सुटका होण्यास मदत होईल. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, यावर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी, इस्रायल-हमास युद्धबंदी फक्त आमच्या ऐतिहासिक विजयामुळे शक्य झाले आहे. माझे प्रशासन हे शांततेसाठी काम करणारे आहे.
गेल्या दोन वर्षापासून जगभरातील मोठ्या कंपन्यांना हिंडेनबर्गने लक्ष्य करून आपले शॉर्ट सेलिंग वाढवले होते. तर भारतातील उद्योगपती गौतम अदानी यांच्या ग्रुपला देखील लक्ष केले होते. यामुळे यांच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली होती. तसेच याप्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना, अदानी यांच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच याच प्रकरणात सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते. दरम्यान हिंडेनबर्गने रोब्लॉक्स, निकोला कॉर्पोरेशन, क्लोव्हर हेल्थ, ड्राफ्टकिंग्ज, ब्लॉक अशा कंपन्यांना देखील लक्ष केले होते.
पण आता अमेरिकेत सत्ताबदल होताच, हिंडेनबर्गला झटका बसला आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शपथविधीच्या आधीच नाथन अँडरसन यांच्या नेतृत्वाखालील हिंडेनबर्गने शॉर्ट सेलिंग कंपनीला कुलुप लावण्याची वेळ आली आहे. याबाबत हिंडनबर्ग रिसर्चच्या संस्थापक नॉथन अँडरसन यांनी कंपनी बंद करत असल्याची घोषणा सोशल मीडिया साईटवर केली आहे. त्यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट लिहून, कंपनी बंद करत असल्याचा निर्णय जाहीर करताना, कंपनी बंद करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत, आम्ही जे काही ठरवलं होतं ते पूर्ण झालं आहे. यामुळे आता आम्ही कंपनी बंद करत आहोत, असेही अँडरसन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आता ट्रम्प यांच्या विजयानंतर गौतम अदानी यांची पोस्ट व्हायरल होत असून त्यांनी दिलेल्या शुभेच्छा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. ट्रम्प यांना मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल अभिनंदन करताना, त्यांनी पोस्ट केली होती. जगातील अशी एक व्यक्ती, जी अटल दृढनिश्चय, अदम्य धैर्य, अथक दृढनिश्चय आणि ज्यावर विश्वास ठेवते त्यावर टिकून राहण्याचे धैर्य दर्शवते, ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. असे म्हटले होते.
हिंडेनबर्ग बंद पडण्याच्या बातम्या येताच आता भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी, भारताविरुद्ध खोटे पसरवणाऱ्यांना काँग्रेस पाठिंबा देते अशी टीका केली आहे. हिंडेनबर्ग भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचे आणि वैयक्तिक नफा कमविण्याचे काम करत होती.
मात्र देशातील काही राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी हिंडेनबर्गच्या शब्दांना धार देवून उद्योजकांवर टीका केली. विशेषतः राहुल गांधी, एका पक्षाला आणि एका व्यक्तीला विरोध करताना, अर्थव्यवस्थेच्या विरोधात उभे राहिले. त्यांनी हिंडेनबर्गच्या मदतीने, खोटे आणि निराधार आरोप करून, भारतीय अर्थव्यवस्थेला आर्थिक अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.