Donald Trump Oath : ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी मोदींना निमंत्रण नाही, भारताकडून कोण जाणार?; काऊंटडाऊन सुरू

PM Narendra Modi S Jaishankar Oath taking Ceremony : डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
Donald Trump, Narendra Modi
Donald Trump, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प सज्ज झाले आहेत. त्यांच्या शपथविधीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून जगभरातील नेत्यांना त्यासाठी निमंत्रणं पाठवली जात आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. पण पंतप्रधान मोदी या सोहळ्याला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जगभरातील अनेक मोठ्या व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 जानेवारीला होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भारताकडून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. ‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावर एस. जयशंकर हे अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतील,’ असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Donald Trump, Narendra Modi
Indian Economy : चिंताजनक! परकीय गंगाजळीमध्ये 10 महिन्यांचा नीचांक, रुपयाची ऐतिहासिक घसरण; काय घडतंय?

चीनच्या राष्ट्रपतींना निमंत्रण

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांच्यासह इतर काही प्रमुख नेत्यांनाही वैयक्तिक निमंत्रण पाठवले आहे. सध्या अनेक मुद्द्यांवर अमेरिका व चीनमध्ये मतभेद आहेत. यापार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी थेट राष्ट्रपतींना निमंत्रित केले आहे. ट्रम्प यांनी त्यासाठी परंपरा मोडित काढलली आहे. परंपरेनुसार देशाच्या प्रमुखांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधीसाठी निमंत्रित केले जात नाही.

डोनेशनचा पाऊस

अमेरिकेच्या नव्या प्रशासनाला खूश करण्यासाठी उद्योगजगतातील अनेकांशी शपथविधीसाठी मोठे दान केले आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, 200 मिलियन डॉलरचा टप्पा पार होऊ शकतो. दिग्गज बोइंग कंपनीने या सोहळ्यासाठी 1 मिलियन डॉलर देण्याचे आश्वासन दिले आहे. गूगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांकडूनही डोनेशन दिले जाणार आहे. या यादीत अनेक मोठ्या कंपन्या आहेत.

Donald Trump, Narendra Modi
Assembly Election Campaign : कुणी 100, कुणी 1000 रुपये द्या! खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनच निवडणुकीसाठी क्राऊड फंडिंग

व्हीआयपी पास संपले

कोट्यवधी रुपयांचे दान देऊनही अनेक उद्योगपतींना व्हीआयपी पास मिळाला नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. व्हीआयपी जागा नसल्याने डोनेशन देऊनही त्यांची निराशा झाली आहे. आता त्यांना सर्वसामान्य लोकांमध्ये तिकीट विकत घेऊन बसावे लागणार आहे. ही तिकीटेही मर्यादित असल्याचे वृत्त आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com