President Droupadi Murmu protocol controversy : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नवव्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालला गेल्या होत्या. यावेळी ममता बॅनर्जींकडून राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचे पालन न झाल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तर राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारवर टीका केली आहे.
शिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती त्यांच्या नियोजित संथाल परिषदेत सहभागी झाल्या. मात्र, राज्य सरकारने अचानक या कार्यक्रमाचे ठिकाण बदलले. शिवाय पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथ आयोजित कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बनर्जींच्या सरकारमधील कोणीही मंत्री उपस्थित नव्हतं.
त्यामुळे ही बाब राष्ट्रपतींचा अपमान करणारी असल्याची भावना आता देशभरातून व्यक्त केली जात आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, आदिवासी समाजातून आलेल्या राष्ट्रपतींनी स्वतः व्यक्त केलेल्या वेदना आणि संतापामुळे देशातील जनतेच्या मनात मोठी खंत असून दुःख झालं आहे.
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींचा झालेला हा अपमान राज्यातील प्रशासनामुळेच घडलं आहे, अशा शब्दात मोदींनी आपली नाराजी व्यक्त केली. तर राष्ट्रपती मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या, ममता बॅनर्जी माझ्या लहान बहिणीसारख्या आहेत, त्या माझ्यावर नाराज आहेत, असे मला वाटत नाही. परंतु तरीही इतके लहान ठिकाण का देण्यात आले, हे समजत नाही.
यातून असे दिसून येते की, कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि नंतर निघून जावे, असा त्यांचा हेतू होता. बिधाननगर मैदान मोठे आहे. या मोठ्या मैदानात आंतरराष्ट्रीय संथाल परिषद झाली असती तर सुमारे पाच लाख लोक उपस्थित राहू शकले असते. एवढे मोठे मैदान उपलब्ध असताना परिषदेसाठी एवढी लहान जागा का निवडली? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी ममता बॅनर्जी यांच्या राज्य सरकारचे वर्तन अत्यंत निषेधार्ह आणि अत्यंत लज्जास्पद आहे. माननीय राष्ट्रपती हे आपल्या राष्ट्राचे सर्वोच्च संवैधानिक अधिकारी आहेत आणि अशा प्रकारचा उघड अनादर ममता बॅनर्जी ज्या अहंकाराला आणि धोकादायक राजकीय संस्कृतीला प्रोत्साहन देतात, त्याचे प्रतिबिंब आहे.
राष्ट्रपतींचा अपमान हा संविधानाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे, असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत त्याच्या आधीच तेथील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.