Congress News: भाजपचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; एकाचवेळी जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Congress Maharashtra President: काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्याच बुलढाणा जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. चिखली विधानसभा क्षेत्रातील अनेक स्थानिक काँग्रेस नेत्यांनी घड्याळाची साथ सोडत कमळ हाती घेतलं आहे.
Congress state president Harshvardhan Sapkal
Congress state president Harshvardhan Sapkal Sarkarnama
Published on
Updated on

Chikhali News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मोठा टप्पा पार पडला. यानंतर राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इन्कमिंंग पाहायला मिळालं होतं. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्याच बुलढाणा जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. चिखली विधानसभा क्षेत्रातील अनेक स्थानिक काँग्रेस नेत्यांनी घड्याळाची साथ सोडत कमळ हाती घेतलं आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.7 मार्च) मुंबईत हा कार्यक्रम झाला.

बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदू सवडतकर, शहराध्यक्ष राहुल सवडतकर, पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद देशमुख, काँग्रेसचे नेते गुलाबराव सपकाळ, किसान काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद पालवे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अमोल काकडे, यांच्यासह नेतेमंडळींनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

Congress state president Harshvardhan Sapkal
Shiv Sena UBT action : उद्धव ठाकरेंचा दणका! तीन नगरसेवकांना 'फायनल' नोटीस; 48 तासांचा अल्टिमेटम संपताच करणार मोठी कारवाई?

लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहिलेले कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय.पाटील यांनी सतेज पाटील यांनाच धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या तोंडावर ए. वाय. पाटील यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना हा धक्का समजला जातो.

Congress state president Harshvardhan Sapkal
Government Scheme: मुख्यमंत्र्यांची विधानसभेतच सर्वात मोठी घोषणा; तिसरं अपत्य जन्माला घातलं, तर मोफत शिक्षण अन् 85000 मिळणार

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना ए वाय पाटील यांनी पाठिंबा देत भविष्याच्या राजकारणात सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याची घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्यासोबत राहून राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन जागांवर आणि पंचायत समितीच्या सहा जागांवर विजय मिळवत राधानगरी तालुक्यावर वर्चस्व ठेवले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com