Dharmendra Pradhan paper leak movement: नीट पेपरलीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ठिकठिकाणचे तरुण दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर एकवटले आहेत.
नुकत्याच या तरुणांच्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. यात अनेकजण जखमी झाले आहेत. पण अशाच एका पेपरलीकविरोधात खुद्द धर्मेंद्र प्रधान यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या विद्यार्थीदशेत एक आंदोलन केलं होतं. नेमकी ती घटना काय होती? जाणून घेऊयात.
काही वर्षांपूर्वी जेव्हा धर्मेंद्र प्रधान हे ओडिशातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) नेते होते. याकाळात १९९४ आणि १९९७ या काळात ते दोन वेळेस अभाविपचे राष्ट्रीय सचिव होते. विद्यार्थी संघटनेचे नेते या नात्यानं त्यांनी विद्यार्थ्यांचं राजकारण आणि चळवळीत सहभाग नोंदवला होता तसंच विद्यार्थ्यांची अनेक आंदोलनांचंही आयोजन केलं होतं.
दरम्यान, सध्या दिल्लीत नीट पेपरलीकिविरोधात सुरु असलेल्या भव्य आंदोलनाची देशभरात चर्चा सुरु असाना धर्मेंद्र प्रधान यांच्याबाबत १९९७ मधील एक घटना उजेडात आली आहे. त्यावेळी ओडिशाच्या मंत्रालयाबाहेर १५०० विद्यार्थ्यांसह एका पेपरलीक विरोधात प्रधान हे आंदोलन करत होते.
यावेळी पोलिसांनी या आंदोलकांवर लाठ्या बरसवल्या होत्या, त्यात धर्मेंद्र प्रधान यांनाही पोलिसांचा मार खावा लागला होता. पोलिसांच्या या लाठीचार्जमध्ये प्रधान यांना फ्रॅक्चरही झाल्याचं समोर आलं आहे, द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.
पण आता या घटनेच्या तीन दशकांनंतर तेच धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय राजकारणात स्थिरावले आहेत. त्यांच्यावर गेल्या बारावर्षापासून मोदी सरकारमध्ये विविध मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
सध्या त्यांच्याकडं शिक्षण मंत्रालय देण्यात आलं आहे. पण आता देशात नुकत्याच झालेल्या नीट पेपर लीक प्रकरणी त्यांना जबाबदार धरलं जात आहे, कारण ते शिक्षण खात्याचे मंत्री आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर लाखो विद्यार्थी एकवटले आहेत. पण अद्याप मोदी सरकारनं या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळं येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र स्वरुप धारण करण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.