Abhijeet Dipke: अभिजीत दिपके आज जंतर-मंतरवर नसणार, आंदोलकांची मागितली माफी; नेमकं काय घडलंय?

CJP Abhijeet Dipke Protest: कॉक्रोच जनता पार्टीचं सध्या दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन सुरु आहे. त्यातच या आंदोलनाचा नेता अभिजीत दिपके सध्या तापानं फणफणत असून गेल्या काही दिवसांपासून अंगदुखीचाही त्रास होत असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
Abhijeet Dipke
Abhijeet DipkeSarkarnama
Published on
Updated on

CJP Abhijeet Dipke Protest: कॉक्रोच जनता पार्टीचं सध्या दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन सुरु आहे. त्यातच या आंदोलनाचा नेता अभिजीत दिपके सध्या तापानं फणफणत असून गेल्या काही दिवसांपासून अंगदुखीचाही त्रास होत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. यासाठी तो आंदोलनस्थळी जंतर-मंतर नसेल, यासाठी त्यानं आंदोलकांची माफी मागितली असून मी पुन्हा येईन असंही त्यानं म्हटलं आहे.

Abhijeet Dipke
Parliament news : भाजपच्या खासदारांना प्रियांका गांधी भिडल्या; संसदेच्या आवारात सत्ताधारी-विरोधकांमध्ये घमासान

दिपकेनं नेमकं काय म्हटलंय?

अभिजीत दिपकेनं आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केली असून यात त्यानं म्हटलं की, "मला सध्या ताप आणि गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अंगदुखीमुळं कमजोरी वाटत आहे. पण पेनकिलर्स घेऊन मी हे दुखणं पुढे ढकलत होतो. पण मी तुमच्या सर्वांची माफी मागतो की आज मी जंतर-मंतरवर नसेन मला थोडासा आराम करण्यासाठी आणि रिकव्हर होण्यासाठी काही तासांचा अवधी द्या. मी आंदोलनस्थळी संध्याकाळपर्यंत पुन्हा येईन"

२३ दिवसांपासून जंतर-मंतरवर

दरम्यान, आजचा कॉक्रोच जनता पार्टीचा आंदोलनाचा २३वा दिवस आहे. हे सर्व दिवस अभिजीत दिपके आंदोलनस्थळी उपस्थित आहे. दरम्यान, सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या २१ व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीनं उचलून नेत रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. त्यानंतर अभिजीत दिपके यानं स्वतः उपोषणाची घोषणा केली, दोन दिवस उपोषण केल्यानंतर वांगचुक यांच्या आग्रहानंतर त्यानं उपोषण मागे घेतलं. पण त्यानंतर २० तारखेच्या संसद भवनावरील मोर्चाच दिपकेनं नेतृत्व केलं. यावेळी दिल्लीत पाऊसही पडत होता. त्याचबरोबर संपूर्ण आंदोलनाचं नियोजन करत असताना पोलिसांसोबत अनेकदा दिपकेची झटापटही झाली होती.

Abhijeet Dipke
Naimisha Pradhan education : ट्रोलिंगचा मनस्ताप! धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने डीएक्टिव्हेट केलं इन्स्टाग्राम; नैमिषा प्रधान नक्की किती शिकलीये?

जंतर-मंतरवर तरुणांची गर्दी

२० तारखेच्या मोर्चासाठी दिल्लीत तरुणांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी अमानुषपणे त्यांच्यावर लाठीचार्ज केला. याचे अत्यंत वेदनादायक व्हिडिओ देखील सोशल मीडियातून समोर आले आहेत. याविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका देखील दाखल झाली असून याठिकाणी गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर पोलिसांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या याचिकेवर सुनावणी करताना मुलांना मारहाण झाल्याचं दिसत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज, पोलिसांच्या अंगावरील कॅमेरे आणि इतर सर्व प्रकारचं चित्रीकरण जपून ठेवावं असे आदेश केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com