“ABVP celebrates major victory in DUSU elections as NSUI’s Rahul Jhasla secures Vice President post.” Sarkarnama
देश

DUSU Election Result : प्रतिष्ठेच्या निवडणुकीत 'ABVP'ने मारली बाजी; काँग्रेसच्या 'NSUI'ला जोरदार झटका...

ABVP Secures Major Victory in DUSU Elections : अध्यक्षपदावर एबीव्हीपीचे आर्यन मान, सचिवपदी कुणाल चौधरी आणि संयुक्त सचिव पदावर दीपिका झा यांचा विजय झाला आहे. तर गोविंद तंवर यांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

Rajanand More

Student Politics in Delhi University Gains Momentum : देशातील दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. या संघावर वर्चस्व राखण्यासाठी भाजप, काँग्रेससह इतर राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांकडून ताकद पणाला लावली जाते. दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर दिल्ली विद्यापीठाची निवडणुकीतही चुरस निर्माण झाली होती. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बाजी मारली आहे.

विद्यार्थी संघाच्या निवडणुकीसाठी गुरूवारी झालेल्या मतदानामध्ये 39.45 टक्के विद्यार्थ्यांनी मतदान केले होते. या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव या चार प्रमुख पदांसाठी एबीव्हीपी आणि एनएसयूआयमध्ये काँटे की टक्कर होते. त्यामध्ये एबीव्हीपीला उपाध्यक्षपद सोडता उर्वरित तिन्ही पदांवर विजय मिळाला आहे.

अध्यक्षपदावर एबीव्हीपीचे आर्यन मान, सचिवपदी कुणाल चौधरी आणि संयुक्त सचिव पदावर दीपिका झा यांचा विजय झाला आहे. तर गोविंद तंवर यांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. या पदावर एनएसयूचे राहुल झांसल विजयी झाले आहे. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये सर्व चार पदांवर एबीव्हीपीचे उमेदवार आघाडीवर होते. पण उपाध्यक्षपदासाठी चुरस पाहायला मिळाली. यामध्ये झांसल यांनी बाजी मारली.

गतवर्षीच्या निवडणुकीड एनएसयूआयने अध्यक्ष आणि संयुक्त सचिव या दोन पदांवर कब्जा केला होता. रौनक खत्री अध्यक्ष तर लोकेश चौधरी संयुक्त सचिव बनले होते. त्यावेळी एबीव्हीपीला उपाध्यक्ष आणि सचिवपद मिळाले होते. जवळपास सात वर्षांनंतर गतवर्षी एबीव्हीपीला अध्यक्षपद गमवावे लागले होते. यंदा मात्र पुन्हा एकदा एबीव्हीपीन या पदावर कब्जा करत आपली ताकद दाखवून दिली.

दणदणीत विजय

एबीव्हीपीच्या तिन्ही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. आर्यन मान यांना 28 हजार 841 मते मिळाली आहेत. त्यांनी जोललिन चौधरी यांचा सुमारे 16 हजार मतांनी पराभव केला आहे. सचिव पदाच्या निवडणुकीत कुणाल चौधरी यांनीही दणदणीत विजय मिळवला. त्यांना 23 हजार 779 मते मिळाली. तर संयुक्त सचिवपदाच्या निवडणुकीत दीपिका झा यांना 21 हजार 825 मते मिळाली. या दोघांचा अनुक्रमे सात हजार आणि चार हजार मतांनी विजय मिळवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT