Election Commission  Sarkarnama
देश

Election Commission update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, आगामी निवडणुकांसाठी 320 IAS, 60 IPS ची फौज...

ECI to Deploy 470 Officers for Bihar Elections : बिहार निवडणुकीप्रमाणे जम्मू काश्मीरमधील बडगाव व नगरोटा, राजस्थानातील अंता, झारखंडमधील घटसिला, तेलंगणातील ज्युबिली हिल्स आदी मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

Rajanand More

Role of IAS, IPS, and IRS Officers as Central Observers : भारतीय निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांसाठी तब्बल ४७० अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये 320 आयएएस, 60 आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. निवडणुकीची प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी आयोगाकडून विविध पावले उचलली जात आहेत. त्यासाठी या अधिकाऱ्यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

देशातील विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केली जाते. यामध्ये नियुक्त अधिकारी देशभरातील विविध राज्यांमधील असतात. पुढील काही दिवसांवर बिहार विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले. आयोगाकडून कंबर कसली आहे.

बिहार निवडणुकीप्रमाणे जम्मू काश्मीरमधील बडगाव व नगरोटा, राजस्थानातील अंता, झारखंडमधील घटसिला, तेलंगणातील ज्युबिली हिल्स, पंजाबमधील तार्न तरण, मिझोराममधील डंपा आणि ओडिशातील नौपाडा या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. बिहार निवडणुकीसोबत या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आयोगाकडून अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे.

याबाबत आयोगाने म्हटले आहे की, निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे अधिकारी आयोगाच्या नियंत्रणाखाली काम करतील. निवडणूक पारदर्शक, सुरळीत आणि योग्यप्रकारे पार पडावी, याची मोठी जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल. ते आयोगाचे कान आणि डोळे बनून काम करतील. त्यानुसार आयोगाकडे विविध बाबींचा पाठपुरावा करतील.

निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याजोग्या बाबी शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची जबाबादारी या निरीक्षकांची असणार आहे, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत आयोगाकडून बिहारमधील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. लवकरच आयोगाचे पथक बिहारचा दौरा करून तयारीचा आढावा घेणार आहे. त्यानंतर वेळापत्रक जाहीर केले जाईल.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांकडून मतचोरीचा आरोप सातत्याने केला जात आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून पारदर्शकपणे निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी अधिक जोरकसपणे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी बिहारची निवडणूक अधिक महत्वाची मानली जात आहे. तर राजकीयदृष्ट्या इंडिया आघाडी आणि एनडीएसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT