Several top Telugu actors and influencers are under ED investigation for allegedly promoting illegal betting apps, leading to serious legal implications Sarkarnama
देश

ED action against actors : विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती ते प्रकाश राज : तब्बल 29 सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर; गुन्हा दाखल

ED Registers Case Against 29 Telugu Celebrities : ईडीने तेलंगणातील तब्बल 29 प्रसिद्ध कलाकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा, प्रकाश राज, राणा दग्गुबती, मंचू लक्ष्मी यांच्यासह निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला, प्रणिता सुभाष, अँकर श्रीमुखी, श्यामला, यूट्यूबर हर्षा साई, बय्या सनी यादव यांचा समावेश आहे.

Jagdish Patil

ED action Against Telugu actors : ईडीने तेलंगणातील तब्बल 29 प्रसिद्ध कलाकारांना युट्यूबर्स आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरच्या विरोधात बेकायदेशीर बेटिंग अॅप्सचा प्रचार केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा, प्रकाश राज, राणा दग्गुबती, मंचू लक्ष्मी यांच्यासह निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला, प्रणिता सुभाष, अँकर श्रीमुखी, श्यामला, यूट्यूबर हर्षा साई, बय्या सनी यादव यांचा समावेश आहे.

या कलाकांवरील कारवाई सायबराबाद पोलिसांनी नोंदवलेल्या प्राथमिक अहवालाच्या (FIR) आधारे करण्यात आली आहे. मियापूर येथील 32 वर्षीय व्यापारी फणिंद्र शर्मा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली.

अनेक सामान्य लोक या बेटिंग अॅप्समध्ये पैसे गुंतवत आहेत. हे अ‍ॅप्स मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक संकटात टाकत आहेत आणि या अॅप्सचं प्रमोशन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते करत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

तक्रारीनुसार सायबराबाद पोलिसांनी 19 मार्च 2025 रोजी 25 सेलिब्रिटींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये आयपीसी, तेलंगणा गेमिंग कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर ईडीने आता हे प्रकरण मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) पुढील कारवाई सुरू केली आहे.

या कारवाई अंतर्गत आता पोलिसांनी सेलिब्रिटींकडून प्रमोशन, आर्थिक व्यवहार आणि कर नोंदींसाठी मिळालेल्या पैशांची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांचे म्हणण्यांनुसार, या अ‍ॅप्समध्ये हजारो कोटी रुपयांचे व्यवहार होतात, जे तरुणांना सहज कमाईचे आमिष दाखवून त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान करतात.

मात्र, या तक्रारीनंतर आता अभिनेत्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अभिनेता विजय देवेराकोंडाच्या टीमने सांगितलं की, ते फक्त कौशल्य-आधारित गेमिंग प्लॅटफॉर्म A23 चं प्रमोशन केलं होतं. जो करार 2023 मध्ये संपला आहे.

तर प्रकाश राज यांनी आपण 2016 मध्ये एका अॅपचा प्रचार केला होता. मात्र, नंतर मी जे करतोय ते चुकीचे समजून त्यापासून लांब झालो, असं सांगितलं. मात्र, तरीही तेलुगू चित्रपट इंडस्ट्रीत हे प्रकरण मोठ्या वादाचं कारण बनलं असून ईडीच्या चौकशीमुळे या सेलिब्रिटींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT