Sanjay Gaikwad : मी साऊथच्या लोकांना मारलं; त्यांनीच महाराष्ट्र नाचवलाय, मग पुळका कशाला? संजय गायकवाडांकडून मारहाणीचं समर्थन

Sanjay Gaikwad Controversy : आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून आता विरोधकांनी आमदार गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी थेट विधीमंडळात केली आहे.
Sanjay Gaikwad Controversy
Sanjay Gaikwad ControversySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 10 Jul : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून आता विरोधकांनी आमदार गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी थेट विधीमंडळाच्या सभागृहात केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांनी केलेली मारहाण चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

मात्र, संजय गायकवाड यांनी मी केलं ते चांगल्यासाठी आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी केल्याचा अजब दावा केला आहे. तर विरोधकांना साऊथ इंडियन लोकांचा इतका पुळका का? असा सवाल उपस्थित केला आहे.

Sanjay Gaikwad Controversy
Love Jihad : लव्ह जिहादचा 'एफसी रोड पॅटर्न' सांगणाऱ्या गोपीचंद पडळकरांना हिंदू व्यापाऱ्यांनी तोंडघशी पाडलं, सणसणीत उत्तर देत म्हटले,...

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं समर्थन करताना गायकवाड म्हणाले, "मी ज्याला मारहाण केली तो वेटर नव्हता तर तो मॅनेजर होता. आता त्याला मालकाने सस्पेंड केलं आहे. तो लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळत होता. मला स्वतःला पोटाचा आजार आहे.

मी 20 वर्षांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त आहे आणि ते जर मला विषारी जेवण देणार असतील आणि मला जर काही त्रास होणार असेल तर माझी रिअ‍ॅक्शन चुकीची नव्हती. माझा मार्ग चुकीचा आहे पण माझ्या कृतीमुळे येणाऱ्या काळात लाखो महाराष्ट्रातील नागरिकांचं आरोग्य वाचणार आहे.

Sanjay Gaikwad Controversy
Mohan Bhagwat : "पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते तेव्हा..." : मोहन भागवत यांचं सूचक विधान; PM मोदींना थांबण्याचा सल्ला?

शिवाय ही छोटीशी मारहाण आहे. मला सगळे कायदे माहिती आहेत. हा फक्त एनसी मॅटर आहे, असं म्हणत त्यांनी आपल्या कृतीचं समर्थन केलं. दरम्यान, यावेळी त्यांनी थेट साऊथ इंडियन लोकांचा विरोधकांना पुळका का? असा सवाल उपस्थित केला. विरोधक माझ्यावर टीका करत आहेत.

मात्र, मला त्यांना सांगायचं आहे की हे साऊथचे लोक आहेत. या लोकांनी तुमचा महाराष्ट्र नाचवला. सगळ्या लेडीज बारमध्ये महाराष्ट्राची तरुणाई बरबाद केली. महाराष्ट्राचं कल्चर खराब केलं. आज तुम्हाला त्यांचा इतका पुळका का? मी जे केलं ते महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसाठी केलं, असा अजब दावा गायकवाड यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com