Anil Jaisinghani News update :
Anil Jaisinghani News update : Sarkarnama
देश

ED Arrests Anil Jaisinghani : अनिल जयसिंघानीला अहमदाबादमध्ये ED कडून अटक

सरकारनामा ब्यूरो

Bookie Anil Jaysinghani Arrest : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणातील बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आता अहमदाबादच्या ईडी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आज (शनिवारी) आयपीएल (IPL Money laundering) मनी लाँड्रिंग प्रकरणात जयसिंघानीला अहमदाबाद अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) युनिटने ताब्यात घेतले आहे.

5 राज्यात वॉन्टेड, 8 वर्षांपासून फरार क्रिकेट बुकी म्हणून ओळख असलेल्या जयसिंघानीयाला गुजरातमधून अटक करण्यात आली होती. काही दिवसापूर्वी 5 विशेष पोलीस पथकं आणि 72 तासाचा ऑपरेशनच्या थरारानंतर तो पोलिसांच्या तावडीत सापडला होता.

अमृता फडणवीस यांच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी लाच प्रकरणात जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा हिला अटक करण्यात आली होती. अनिक्षा आणि अमृता फडणवीस यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध विकसित झाले.

त्यानंतर अनिक्षा हिने अमृता फडणवीस यांना विनंती केली की, वडिलांवर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांना गुन्हे किंवा तक्रारीमधून वाचवावे. मात्र या गोष्टीला अमृता फडणवीस यांनी नकार दिल्याने अनिक्षाने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनिक्षाने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. अनिक्षा सध्या जामीनावर बाहेर आहे.

काय आहे प्रकरण

ईडीकडून अहमदाबाद कोर्टात सुरु असलेल्या 2015 मधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जयसिंघानी याची चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असताना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर न्यायालयात जयसिंघानी यांच्या कोठडीची मागणी केली आहे.

जयसिंघानी यांना नुकतेच मध्यप्रदेश पोलिसांनी कथित बुटलेगिंग प्रकरणात ताब्यात घेतले होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा एका फेडरल एजन्सीद्वारे तपास सुरु असताना ईडीने जयसिंघानीवर ही कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडी जयसिंघानी याचा जबाब नोंदवत असताना शुक्रवारी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

असे उघडकीस आले प्रकरण..

अमृता फडणवीस यांनी आपल्या तक्रारीनुसार, अनिक्षा नावाची महिला 2021 मध्ये भेटली. आपण एक डिझायनर असून पब्लिक इव्हेंटमध्ये आपण डिझाईन केलेले कपडे आणि ज्वेलरी परिधान करावी, जेणेकरुन त्याचं प्रमोशन होईल. हळूहळू तिने अमृता यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर अनिक्षाने अमृता यांना माझ्या वडिलांना एका प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही त्यांना सोडवा अशी विनंती केली. अनिक्षा जयसिंघाने या मुलीने आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी एक कोटी रुपये देऊ असं अमृता यांना सांगितलं. त्यामुळे अमृता यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आणि हे प्रकरण उघड झालं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT