Baramati Bank News : राजीनाम्यानंतर दोन दिवसातच सातव, पहाडेंची फेरनिवड ; अजित पवारांनी..

Baramati Co-operative Bank News : अध्यक्षपदी सचिन सातव यांची फेरनिवड करण्यात आली.
pritam pahade, sachin satav
pritam pahade, sachin satav Sarkarnama
Published on
Updated on

Baramati Co-operative Bank News : राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांच्या सूचनेवरून बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष रोहित घनवट तसेच तज्ज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर व प्रीतम पहाडे या चौघांनी दोन दिवसापूर्वी राजीनामे दिले होते.

बँकेच्या चार महत्त्वाच्या संचालकांचे राजीनामे अजित पवार यांनी घेतल्यानंतर बारामतीच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. आज (शनिवारी) झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेच्या अध्यक्षपदी सचिन सातव यांची फेरनिवड करण्यात आली.

अजित पवार यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदी सचिन सातव यांची तर तज्ज्ञ संचालकपदी प्रीतम पहाडे यांची फेरनियुक्ती झाली आहे. सचिन सातव, प्रीतम पहाडे या दोघांनाही अजित पवार यांनी त्यांच्या जागी कायम ठेवत आगामी काळातील बँकेची जबाबदारी सोपविल्याने त्यांच्या कामगिरीवर पवार समाधानी असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

pritam pahade, sachin satav
Eknath Shinde Ayodhya Tour : शिंदेंनी जे केलं ते योग्यचं..मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे धर्माच्या विरोधात गेले ; अयोध्येत पुजारी..

बँकेचा एनपीए लक्षणीयरित्या खाली आणण्यात संचालक मंडळास यश प्राप्त झाले होते. बँकेच्या आर्थिक सुधारणेच्या कार्यक्रमात सचिन सातव व प्रीतम पहाडे यांचा मोलाचा सहभाग होता.

बारामती सहकारी बँकेचा एनपीए शून्य टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट असून आगामी काळात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष सचिन सातव यांनी नमूद केले. बारामती सहकारी बँकेने ३१ मार्च अखेर ३६३२ कोटींचा एकूण व्यवसाय करत ५३. २९ कोटींचा तरतूदीपूर्व ढोबळ नफा मिळविला आहे.

pritam pahade, sachin satav
Ajit Pawar News : 'त्या' वृत्ताचा अजित पवार यांनी घेतला समाचार; म्हणाले..

आजवरच्या ढोबळ नफ्यात हा विक्रमी नफा आहे. सर्व तरतूदी पूर्ण करत बँकेने ७.९० कोटींचा निव्वळ नफा मिळविला. बँकेचे नक्त मुल्य १२८ कोटींवर पोहोचले आहे. बँकेने या आर्थिक वर्षात विक्रमी वसूली करून अनुत्पादक जिंदगी (एनपीए) चे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले आहे.

बँकेचे पुणे, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक व रायगड अशा सहा जिल्ह्यात कार्यक्षेत्र असून बँकेच्या 36 शाखा व एक विस्तारीत कक्ष आहे. बँकेने गतवर्षात 3632 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com