Enforcement Directorate officials escort TMC MLA Jiban Krishna Saha after arrest in connection with the West Bengal SSC assistant teacher recruitment scam. Sarkarnama
देश

ED Raid Video : छापेमारीनंतर आमदाराची पहिल्या मजल्यावरून उडी; ED च्या अधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत शेतात पकडले...

ED Arrests TMC MLA Jiban Krishna Saha in SSC Scam : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी आमदार साहा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मनी लॉर्न्डिंगचे आरोप आहेत.

Rajanand More

Impact of SSC Scam on West Bengal Politics : केंद्रीय तपास यंत्रणांकडून भ्रष्टाचारी नेत्यांची घरे, कार्यालयांवर अचानक छापेमारी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. या छापेमारीदरम्यान यंत्रणांकडून काही नेत्यांना अटकही करण्यात आली आहे. पण छापा पडताच घरातून आहे त्याच कपड्यांत पळून जाण्याची हिंमत नेत्यांकडून केली जात नाही. सोमवारी असा प्रकार घडला आहे.

सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बुरवान विधानसभा मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्ण साहा यांना अटक केली. त्याआधी ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर साहा यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. घराच्या पहिल्या मजल्यावरून त्यांनी खाली उडली मारली. त्यानंतर घराची सीमाभिंत पार करत ते शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते.

साहा हे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच सुरक्षा दल आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठलाग करत पकडले. आमदार साहा यांनी अटक होण्यापूर्वी घराशेजारील ड्रेनेजमध्ये आपले मोबाईल पेकून देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ईडीने तातडीने त्याचा शोध मोबाईल ताब्यात घेतले. त्याची तपासणी फॉरेन्सिक विभागाकडून केली जाणार आहे.

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी साहा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मनी लॉर्न्डिंगचे आरोप आहेत. याप्रकरणी सोमवारी ईडीने साहा यांच्यासह त्यांच्या निकवर्तीयांच्या घरीही एकाचवेळी छापेमारी केली. या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात मनी लॉर्न्डिंग झाल्याचा संशय ईडीला आहे.

मागील दोन वर्षांपासून तपास यंत्रणांकडून शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास केला जात आहे. यापूर्वी सीबीआयनेही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. टीएमसीच्या अनेक नेत्यांची चौकशी करण्यात आली असून साहा यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांचाही समावेश आहे.

पार्थ यांच्यासह आमदार माणिक भट्टाचार्य यांना 2022 मध्ये तर साहा यांच्यासह युवा नेते कुंतल घोष यांना 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यामुळे बंगालमधील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. साहा हे सध्या जामिनावरून बाहेर होते. आता ईडीने साहा यांना अटक करत तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT