.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Vasant Sampat Dupare’s Article 32 Petition Explained : सुप्रीम कोर्टाने सोमवारी ऐतिहासिक निकाल देताना नागपुरातील वसंत संपत दुपारे यांची फाशीची शिक्षा स्थगित केली आहे. सुप्रीम कोर्टानेच यापूर्वी 2014 मध्ये दुपारेची फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार करण्याच याचिका फेटाळली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर दुपारे याने पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत कोर्टाने आपल्याच निकालाला स्थगिती दिली आहे.
वसंतु दुपारे याने सुप्रीम कोर्टाच्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले होते. न्यायाधीश विक्रम नाथ, संजय करोल आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने ही याचिका मान्य करत शिक्षेला स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टाच्या 2022 च्या निकालात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार न करता दोषीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती, असे कोर्टाने सोमवारी दिलेल्या निकालात म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, आरोपी वसंत दुपारे याच्या शिक्षेचा पुनर्विचार केला जाईल. त्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी नवीन खंडपीठ नियुक्त करण्यासाठी हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठविले जाईल. कलम 32 (प्रकरणे पुन्हा सुनावणीसाठी) अंतर्गत आरोपी व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांना हानी पोहोचवणाऱ्या गंभीर प्रक्रियात्मक त्रुटी असतील तर त्याचा पुनर्विचार करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
नागपुरातील वाडी परिसरात 3 एप्रिल 2008 रोजी दुपारे याने चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपीला 2010 मध्ये नागपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात त्याने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. कोर्टाने 2011 मध्ये निकालाला स्थगिती देत पुन्हा हे प्रकरण सत्र न्यायालयात पाठविले होते.
सत्र न्यायालयाने फेब्रुवारी 2012 मध्ये पुन्हा दुपारे या दोषी धरत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. हायकोर्टानेही मार्च 2014 मध्ये दुपारेची याचिका फेटाळून लावत शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टानेही त्याची याचिका फेटाळली होती. त्याने नंतर केलेली पुनर्विचार याचिकाही कोर्टाने 2017 मध्येच फेटाळली होती. दुपारे याने त्यानंतर राष्ट्रपतींकडे दया याचिका अर्ज केला होता. हा अर्जही फेटाळण्यात आला होता.
राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळल्यानंतर दुपारे याने 2023 मध्ये सुप्रीम कोर्टात कलम 32 अंतर्गत रिट पिटीशन दाखल केली होती. त्यावर सोमवारी निकाल देत कोर्टात याचिका मान्य करत शिक्षेवर सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच शिक्षेलाही स्थगित देण्यात आली आहे. सत्र न्यायालयाकडून दोनदा शिक्षा, हायकोर्टासह सुप्रीम कोर्टाकडून दोनदा याचिका फेटाळून लावल्यानंतर आणि राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळल्यानंतर दुपारे याच्या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.