ED Vs Hemant Soren Sarkarnama
देश

ED Vs Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या जामिनास 'ED'ने सर्वोच्च न्यायालयात दिले आव्हान!

Mayur Ratnaparkhe

ED, Hemant Soren and Supreme Court News : झारखंडमधील राजकीय घडामोडी सुरूच आहेत. मुख्यमंत्रिपदाची पुन्हा एकदा शपथ घेतल्यानंतर आज(सोमवार) हेमंत सोरेन यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. बहुमत चाचणी पास केल्यानंतर हेमंत सोरेन सरकारने कॅबिनेट विस्तार केला.

ज्यामध्ये 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हेमंत सरकारच्या मंत्रिमंडळात चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. ज्यामध्ये दोन काँग्रेस आणि आणखी दोन झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांचा समावेश आहे.

केवळ बसंत सोरेन आणि बादल पत्रलेख यांना सोडून सर्व जुन्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. या दरम्यान हेमंत सोरेन यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. EDने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामीनास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. ईडीने सर्वोच्च न्यायालयास उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे.

EDने आरोप केला आहे की, उच्च न्यायालयाच्या टिप्पण्या पक्षपाती दिसत आहेत. उच्च न्यायालयाची टिप्पणी योग्य नाही. ज्यामध्ये न्यायालयाने म्हटले होते की, सोरेन यांच्याविरोधात प्राथमिकदृष्ट्या कोणताही खटला तयार होत नाही.

ईडीने हेमंत सोरेन(Hemant Soren) यांना दहावेळा समन्स पाठवले होते. मात्र सोरेन यांनी केवळ दोन समन्सलाच उत्तर दिले होते. जवळपास आठ तासांच्या चौकशीनंतर 31 जानेवारी 2024 रोजी रात्री उशीरा ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली होती. अटकेपूर्वीच हेमंत सोरेन यांनी राज्यापालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता. त्यानंतर 28 जून रोजी जवळपास पाच महिन्या नंतर हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर आले होते. हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी चंपई सोरेन यांना बसवण्यात आलं होतं.

दरम्यान विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये सोमवारी सकाळी हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला होता. त्यांच्या बाजूने 45 आमदारांनी मतदान केले. बहुमत सिध्द करण्यासाठी 39 आमदारांची गरज होती. त्यामुळे हेमंत सोरेन यांनी हा ठराव सहज जिंकला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT