Hemant Soren : षडयंत्राच्या अंताची सुरूवात! राज्यपालांना भेटताच हेमंत सोरेन यांची डरकाळी

Jharkhand Mukti Morcha CM Hemant Soren Champai Soren : हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी सायंकाळी शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.
CP Radhakrishnan, Hemant Soren
CP Radhakrishnan, Hemant SorenSarkarnama
Published on
Updated on

Ranchi : कथित भूखंड घोटाळाप्रकरण जामीनावर जेलमधून बाहेर आल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरूवारी त्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा केला.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे गुरूवारी सायंकाळी हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देतील. सोरेन तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. राज्यपालांना भेटल्यानंतर त्यांनी एक्सवर पोस्ट करत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.

सोरेन यांनी राज्यपालांचे आभार मानत विरोधकांनी रचलेल्या लोकशाहीविरोधी षडयंत्राच्या अंताची सुरूवात झाल्याचे म्हटले आहे. सत्यमेव जयते, असे पोस्टमध्ये शेवटी लिहिले आहे. शपथ घेण्याआधीच सोरेन यांनी भाजपला इशारा दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर ते काय पावले उचलणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

CP Radhakrishnan, Hemant Soren
Champai Soren : टायगर को चूहा बना दिया! चंपई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचा नवा डाव

दरम्यान, मावळते मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हेमंत सोरेन हे भावी मुख्यमंत्री असतील हे कालच स्पष्ट झाले होते. त्याआधी संसदीय दलाच्या बैठकीत चंपई सोरेन यांनी पायउतार व्हावे, असे ठरवण्यात आले होते.

हेमंत सोरेन हे मागील आठवड्यातच जेलमधून बाहेर आले आहेत. जानेवारी महिन्यात त्यांना ईडीने अटक केली होती. अटकेआधी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चंपई सोरेन यांनी पदाची शपथ घेतली होती. त्यांना जवळपास पाच महिन्यांचाच कालावधी मिळाला.

CP Radhakrishnan, Hemant Soren
Kirodi Lal Meena : भाजपला धक्का; राजस्थानच्या कृषिमंत्र्यांचा सर्व पदांचा राजीनामा

चंपई सोरेन नाराज?

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याने चंपई सोरेन नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. आमदारांच्या बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती, असेही बोलले जात आहे. तर दुसरीकडे भाजपनेही त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवासी नेत्याचा अपमान हेमंत सोरेन यांनी केल्याची टीका भाजपने केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com