JACA Scam Sarkarnama
देश

JACA Scam: हेमंत सोरेन यांच्यानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री ED च्या रडारवर

Mangesh Mahale

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर आता ईडीच्या रडारवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे आहेत. आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JACA) मधील कथित घोटाळ्याप्रकरणी हे समन्स आहे. श्रीनगरमधील ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी होणार आहे. ते या चौकशीला हजर राहणार की नाहीत, हे लवकरच समजेल.

आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मोदी सरकारला रोखण्यासाठी इंडिया आघाडीने कंबर कसली आहे. फारुख अब्दुल्ला हे इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते मानले जातात.

गेल्या महिन्यातच ईडीने फारुख अब्दुल्ला यांना समन्स बजावले होते, पण त्यावेळी प्रकृतीच्या कारणामुळे आपण चौकशीला हजर राहू शकत नाही, असे त्यांनी ईडीच्या कार्यालयास कळवले होते. 86 वर्षांचे अब्दुल्ला हे आजही चौकशीला उपस्थित राहणार की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही ईडीने आतापर्यंत पाच समन्स बजावले आहेत. फारुख अब्दुल्लांपूर्वी इंडिया आघाडीतील हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने कारवाई केलेले मुख्यमंत्री पदावरील ते पहिले नेते आहेत. आता माजी मुख्यमंत्री असलेले अब्दुल्ला यांच्यावर ईडी काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय आहेत फारुख अब्दुल्लांवर आरोप?

  • फारुख अब्दुल्ला हे 2001 ते 2012 जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.

  • त्यांच्या कार्यकाळात क्रिकेटच्या विकासासाठीचा निधी वैयक्तिक फायद्यासाठी वळवण्यात आल्याचा आरोप आहे.

  • असोसिएशनचे अधिकारी आणि इतरांकडून हा निधी मिळाला, असा आरोप आहे.

  • निधीचा वापर अब्दुल्ला यांनी वैयक्तिक फायद्यासाठी केल्याचा आरोप केंद्रीय तपास यंत्रणांनी केला आहे.

  • 44 कोटी रुपयांचा हा निधी खासगी बँक खाती आणि नातेवाइकांना देण्यात आला. नंतर हा निधी वाटून घेतला, असा आरोप आहे.

  • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT