SALEM: ईडीने राजकीय नेत्यांना समन्स पाठवल्याची बातमी नवी राहिली नाही. मात्र, तमिळनाडूनध्ये दोन दलित शेतकऱ्यांना मनी लाॅड्रिंग प्रकरणी ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल सहा महिन्यापुर्वी ही नोटीस देण्यात आली होती. स्थानिक भाजप नेत्याच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना नोटीस दिल्याची चर्चा आहे. ही नोटीस रद्द करण्यात आली असली तरी नोटीसमध्ये शेतकऱ्यांच्या जातीचा उल्लेख असल्याने संताप व्यक्त केला जातो आहे. नुकतेच हे शेतकरी पोलिसासमोर हजर झाले होते. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले.
एस कन्नियान (वय 72) आणि त्याचा भाऊ एस कृष्णन ( वय 65) अशी ईडीने नोटीस पाठवलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. 26 जून 2023 रोजी कन्नियान आणि कृष्णन यांना ईडीकडून समन्स मिळाले होते. त्यात त्यांच्या जातीच्या नावाचा उल्लेख आहे. त्यांना मनी लाॅड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत चौकशीसाठी 5 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते. भाजप नेते गुणसेकर यांना त्यांना जमीन देण्यासाठी दबाव आणण्यासाठी ईडीने समन्स बजावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.
या शेतकऱ्यांच्या विरोधात भाजपचे सालेम पूर्व जिल्हा सचिव जी गुणसेकर दिवाणी खटला दाखल केला आहे. या दाव्यानुसार 1991 मध्ये या शेतकऱ्यांनी गुणसेकर यांच्या आई लक्ष्मी यांच्याशी करार केला आणि त्यांची जमीन अनिश्चित काळासाठी भाडेतत्त्वावर शेतीसाठी दिली. मात्र, हा दावा शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. ही केस अजूनही अत्तूर न्यायालयात सुरू आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शेतकऱ्यांचे वकीलाने सांगितले की, “ शेतकऱ्यांच्या जमीनीसह आसपास असणाऱ्या 600 एकर जमीन हटपण्याचा डाव आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ईडीचे समन्स पाठवून घाबरवण्यात येत आहे. ५ जुलै रोजी जेव्हा शेतकरी चौकशीसाठी हजर झाले तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत वकिलांना परवानगी दिली नाही. ते पारदर्शक तपास करत नाहीत.
मंगळवारी शेतकऱ्यांना सालेम एसपीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. भाजप नेते गुणसेकर यांनी आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, माझा आणि शेतकर्यांमध्ये जमिनीचा किरकोळ वाद आहे. माझ्याकडे योग्य कागदपत्रे आहेत. याचा माझ्या पक्षाशी काहीही संबंध नाही. ईडीच्या समन्सशी माझा काहीही संबंध नाही. काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.