Election Year 2024 : जगातील निवडणुका यंदा इतिहास घडवणार; भारतासह 65 देशांमध्ये वर्चस्वाची लढाई

Lok Sabha Election 2024 : भारतात एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता...
Election Year 2024
Election Year 2024Sarkarnama
Published on
Updated on

Election Year : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात 2024 हे वर्ष लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांनी गाजणार आहे. मात्र, फक्त भारतच नव्हे, तर जगभरातील जवळपास 65 देशांमध्ये यावर्षी सत्तेसाठी संघर्ष पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच एकाच वर्षात तब्बल 420 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याने इतिहास घडणार आहे.

भारतामध्ये (India) एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election 2024) होणार आहे. तर महाराष्ट्रासह (Maharashtra) आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, हरियाना आणि जम्मू व काश्मीर या राज्यांची विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे, तर विरोधकांकडूनही इंडिया आघाडीच्या माध्यमातून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Election Year 2024
Arvind Kejriwal : भाजपचा मला अटक करण्याचा डाव; ईडी चौकशीवर केजरीवालांचे 'इमोशनल कार्ड'

भारतापाठोपाठ सर्वात मोठ्या लोकशाही देशांमध्ये अमेरिकेचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेतील (America) अध्यक्षीय निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. अध्यक्ष ज्यो बायडेन आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्येच सरळ लढत होण्याची शक्यता आहे. 2020 च्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारताशेजारील पाकिस्तान (Pakistan), श्रीलंका आणि बांग्लादेश या तीन देशांमध्येही निवडणुका आहे. बांग्लादेशात सात जानेवारीला निवडणूक होणार असून पंतप्रधान शेख हसिना पुन्हा पाचव्यांदा सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांग्लादेश राष्ट्रवादी पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या निवडणुकीकडे भारताचेही लक्ष लागले आहे. पाकिस्तानातील निवडणुकीत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि इम्रान खान यांच्या पक्षात लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे. इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यानंतर देशात संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.

Election Year 2024
YS Sharmila : जगनमोहन यांना मोठा धक्का; बहीण शर्मिला यांची काँग्रेसला साथ

रशिया (USSR) आणि इराणमध्येही यावर्षी निवडणुका आहेत. युक्रेनविरुद्धच्या युद्धाचे पडसाद रशियाच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. पण ही निवडणूक किती पारदर्शकपणे पार पडेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे युक्रेनमध्ये निवडणुका असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पण सद्यःस्थितीत अध्यक्षीय निवडणूक होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

Election Year 2024
Arvind Kejriwal: केजरीवालांना आज अटक होऊ शकते; 'आप'च्या मंत्र्यांना भीती..

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इंग्लंडमधील यावर्षीच्या निवडणुकीत केंद्रबिंदू ठरणार आहेत. देशात त्यांची लोकप्रियता वाढली आहे. इराणमध्ये मागील वर्षी 22 वर्षांच्या एका तरुणीच्या मृत्यूनंतर देशभरात पडसाद उमटले होते. त्याचा परिणाम निवडणुकीवर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. युरोपमध्ये नऊ संसदीय निवडणुका आहेत. त्यामुळे सत्ताबदल आणि धोरणांमध्येही अनेक नवीन बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तैवानमधील निवडणुकही यंदा महत्त्वाची मानली जात आहे. तैवानमध्ये 13 जानेवारी रोजी मतदान होत असून चीनशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कुणाची सत्ता येणार, याकडे लक्ष लागले आहे. सध्या अमेरिकेशी चांगले संबंध असलेले लाय चिंग हे आघाडीवर आहेत. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोदो हे अपात्र ठरत असल्याने तिथे यावर्षी नवीन नेत्याकडे हे पद जाणार असल्याचे निश्चित आहे.

निवडणुका होत असलेले इतर काही देश ः

मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अल्जेरिया, उझबेकिस्तान, घाना, मादागास्कर, मोझेंबिक, व्हेनेझुएला, उत्तर कोरिया, तैवान, माली, श्रीलंका, रोमानिया, सेनेगल, रवांडा, बेल्जियम, टयुनिशिया, कंबोडिया, बेलारुस, ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, दक्षिण सुदान, टोगो, फिनलंड, जॉर्डिया, क्रोएशिया, नामिबिया, मॉरिशिअस, भूतान, मालदीव आदी. 

Election Year 2024
Mahua Moitra : तृणमूलच्या नेत्या महुआ मोईत्रांना आणखी एक झटका; अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुकणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com