Mumbai News : मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक चर्चेत राहिलेली तपासयंत्रणा कोणती असेल तर ईडी (सक्तवसुली संचालनालय) ही आहे. ईडीचं नाव काढलं तरी काही राजकीय,व्यावसायिक,बँकांचे मोठमोठे घोटाळे डोळ्यासमोर उभे राहतात. विशेष बाब म्हणजे ईडीच्या तपासचक्रात अडकल्यानंतर काही हायप्रोफाईल प्रकरणांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यसभा खासदार संजय राऊतांसारख्या दिग्गज नेत्यांनाही तुरुंगवारी करावी लागली. पण आता याच ईडीबाबत एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील आयआरएस अधिकारी आणि 'ईडी'चे विशेष संचालक सत्यव्रत कुमार यांनी तब्बल 11 वर्षे अगोदरच तडकाफडकी आपल्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे राजकीय आणि प्रशासकीय विभागांत एकच खळबळ उडाली आहे.
सत्यव्रत कुमार हे ईडीचे विशेष डायरेक्टर या पदावर कार्यरत होते. त्यांची ईडी या तपासयंत्रणेचे एक महत्त्वाचे आणि डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख होती. देशासह महाराष्ट्रातील विविध नामांकित व गाजलेली प्रकरणं हे सत्यव्रत कुमार यांच्या काळात समोर आली होती.
भारतीय महसूल सेवेचे 2004 च्या बॅचचे अधिकारी असलेले सत्यव्रत कुमार हे ईडीच्या मुंबई विभागात 2013 सप्टेंबरमध्ये रुजू झाले होते. मुंबईत ड्युटीवर असताना कुमार यांच्या कालावधीतच समोर आलेल्या काही धक्कादायक प्रकरणांनी खळबळ उडवून दिली होती.
सत्यव्रत कुमार यांची ईडीचे विशेष संचालक राहिलेल्या सत्यव्रत कुमार यांची महाराष्ट्रातील कारकीर्द प्रचंड चर्चेत राहिली. त्यांचा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आणि त्यांनंतरचा महायुती सरकारचा कार्यकाळ चांगलाच गाजला होता.
सत्यव्रत कुमार यांनी विशेष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत पत्राचाळ प्रकरण, माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक गंभीर आरोप आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांसारख्या हायप्रोफाईल प्रकरणांमध्ये चांगलेच चर्चेत आले होते. या तीनही बड्या नेत्यांना ईडीच्या तपासयंत्रणांकरवी चौकशीच्या फेऱ्यांमध्ये आणले होते.
ईडीचे विशेष संचालक सत्यव्रत कुमार यांनी या सर्व प्रकऱणांमध्ये जातीनं लक्ष घातलं होतं. या सर्व प्रकरणांमध्ये ईडीचे विशेष संचालक म्हणून सत्यव्रत कुमार यांनी घोटाळ्याच्या मुळाशी जातानाच लेशमुख,राऊत,मलिक यांच्यावर अटकेपर्यंत कारवाई केली होती. या सर्व प्रक्रियेदरम्यान सत्यव्रत कुमार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती.
सत्यव्रत कुमार यांच्या धडाकेबाज काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांची केंद्रीय संस्थेतील काम करण्याची मुदत 2022 ते ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली होती. पण आता विशेष डायरेक्टर सत्यव्रत कुमार यांनी 11 वर्षे उरली असताना अचानकच स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली आहे. सध्या त्यांची सिलीगुरीमध्ये पोस्टिंग होती. त्यांनी मुंबईच्या ईडीविभागात सुमारे 11 वर्षे काम पाहिले.
सत्यव्रत कुमार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यामागे कारणही चर्चेत आलं आहे. कुमार हे गेले काही दिवस आपल्या प्रशासकीय सेवा आणि पोस्टिंगवर नाराज असल्याची चर्चा होती.केंद्र सरकारनं 2025 मध्ये कुमार यांना त्यांच्या मूळ संवर्गात म्हणजेच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात परत पाठवणं हे त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीपाठीमागचं कारण असण्याची शक्यता आहे.
सत्यव्रत कुमार यांच्या काळातील गाजलेली प्रकरणं:
1) मेमन इक्बाल मोहम्मद उर्फ इक्बाल मिर्चीवरील दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरण
2) दहा लाख डॉलर्सपेक्षा जास्त रकमेच्या महादेव ऑनलाइन बुक अवैध ऑनलाइन सट्टेबाजी3
3) हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीशी संबंधित 12,500 कोटी रुपयांचं पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) प्रकरणतस
4) फरार व्यावसायिक विजय मल्ल्याच्या विमान कंपनीशी संबंधित 9200 कोटी रुपयांचा बँक कर्ज घोटाळा प्रकरण
5) येस बँक-दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) व्यवहारात आरोपी असलेल्या संस्थापक राणा कपूर यांच्यावरील PMLA प्रकरणांत सत्यव्रत कुमार यांनी तपासाबाबत आक्रमक भूमिका घेतली होती.
6) नीरव मोदी, पंजाब नॅशनल बँक घोटाळा, मेहुल चोक्सी तसंच नवाब मलिक यांची प्रकरणं सत्यव्रत कुमार यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.