Satara Politics : उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचा हिरमोड! जयकुमार गोरेंची 'बाजी', सांगली-साताऱ्याच्या उमेदवारीवर मत ठरलं वरचढ!

MLC Election Jaykumar Gore Udayanraje : सातारा सांगली मतदारसंघातून उमेदवारी देताना जयकुमार गोरे यांचा शब्द अंतिम ठरला आहे. धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीने दोन्ही राजेंना झटका बसल्याची चर्चा आहे.
Political equations in Satara and Sangli shift as Dhairyashil Kadam's MLC candidature fuels a contest involving Jaykumar Gore, Udayanraje and Shivendraraje.
Political equations in Satara and Sangli shift as Dhairyashil Kadam's MLC candidature fuels a contest involving Jaykumar Gore, Udayanraje and Shivendraraje.sarkarnama
Published on
Updated on

Satara Sangli MLC : भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. सांगली-सातारा मतदारसंघात भाजपची उमेवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता होती. खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या विश्वासू नेत्याला उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. तर, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आपले व्याही पृथ्वीराज देशमुख यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात होते. मंत्री जयकुमार गोरे देखील एका नावासाठी आग्रही होते. त्यामुळे उमेदवारी नक्की कोणाला? भाजपमध्ये कोणाच्या शब्दाला मान याची अंतर्गत चर्चा सुरू झाली होती.

उमेदवार जाहीर करताना मंत्री जयकुमार गोरे यांचे मत वरचढ ठरल्याचे दिसून येते. गोरे यांनी माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम त्यांना उमेदवारी देण्याची विनंती त्यांनी केली होती. ती विनंती मान्य झाल्याचे दिसून आले आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये धैर्यशील कदम यांना सांगली साताऱ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे.

उदयराजे भोसले हे सुनील काटकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते. त्यांनी परस्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे देखील सांगितले जाते. काटकर हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भेटले होते. त्यामुळे उमेदवारीसाठी मोठी चुरस असल्याचे दिसून आले होते.

Political equations in Satara and Sangli shift as Dhairyashil Kadam's MLC candidature fuels a contest involving Jaykumar Gore, Udayanraje and Shivendraraje.
Vidhan Parishad Election : ‘सातारा-सांगली’साठी भाजपचा उमेदवार असणार सातारचा; निष्ठावंतांना न्याय की आयात नेत्याला संधी?

जयकुमार गोरे यांचा शब्द हा उमेदवारीसाठी अंतिम असल्याचे दिसून आले. धैर्यशील कदम हे मुळचे काँग्रेसची पार्श्वभूमी असलेले नेते. २०१४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि २०१९ ची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवली. काँग्रेस-शिवसेना प्रवास करत ते अखेर भाजपवासी झाले. सातारा भाजपचे जिल्हाध्यक्षपद त्यांना देण्यात आले. जयकुमार गोरे यांच्याशी त्यांची जवळीक असल्याचे सांगितले जाते.

'ही' नावे देखील होती चर्चेत

उमेदवारीसाठी सातारा जिल्ह्यातून धैर्यशील कदम, शेखर गोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, पश्चिम महाराष्ट्राचे भाजपचे संयोजक विक्रम पावसकर यांची नावे देखील चर्चेत होती. मात्र, अखेर धैर्यशील कदम यांना उमेदवारी देत भाजपने जयकुमार गोरे यांच्या निवडीवर विश्वास दाखवल्याचे दिसून येते.

Political equations in Satara and Sangli shift as Dhairyashil Kadam's MLC candidature fuels a contest involving Jaykumar Gore, Udayanraje and Shivendraraje.
Satara Sangli MLC: विधानपरिषदेसाठी साताऱ्यात मोठी घडामोड; उदयनराजे अन् गोरेंनी घेतली CM फडणवीसांची भेट; सुचवली वेगवेगळी नावं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com