Charanjit Singh Channi, Rahul Gandhi, Navjot Singh Sidhu, Sunil Jakhar Sarkarnama
देश

मुख्यमंत्रिपद जाताच महिनाभरातच बड्या नेत्याच्या मागे लागली 'ईडी'!

पंजाबमधील सत्ता गेल्यानंतर चरणजीतसिंग चन्नी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) राज्यात काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला आहे. पंजाबमधील सत्ता गेल्यानंतर महिभरातच माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या मागे सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले आहे. चन्नी यांची तब्बल पाच तास ईडीने चौकशी केली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चन्नी यांच्या भाच्यावर कारवाई करण्यात आली होती. सक्त वसुली संचालनालयाकडून (ED) कर चुकवेगिरी प्रकरणात त्यांचे भाचे भूपिंदरसिंग हनी (Bhupinder Singh Honey) यांना 3 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ही कारवाई राजकीय असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. अवैध वाळू उपसा प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली होती.

आता याच प्रकरणात चन्नी यांची ईडीने काल पाच तास कसून चौकशी केली. बेकायदा वाळू उपसा आणि चन्नी यांचे भाच्यासोबतचे संबंध याबाबत ईडीने विचारणा केली. या चौकशीनंतर बोलताना चन्नी म्हणाले की, बेकायदा वाळू उपसा प्रकरणात मला चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले बोते. मी त्यांच्या समन्सला उत्तर देऊन त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही माझ्या माहितीप्रमाणे उत्तरे दिली आहे. या प्रकरणी काढण्यात आलेले चलन आधीच ईडीने न्यायालयात सादर केले आहे. या प्रकरणी पुन्हा चौकशीसाठी येण्याची आवश्यकता नाही, असे मला ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पंजाबमधील पराभवानंतर झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधींनी त्यांच्या चुकीची कबुली दिली होती. अमरिंदरसिंग यांना जास्त वेळ दिला, याची कबुली अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली होती. त्यांच्याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतरही त्यांना न हटवता संधी दिली. त्यानंतर त्यांना बदलण्यात विलंब केला. याची जबाबदारी घेत असल्याचे सांगत सोनिया यांनी चूक मान्य केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT