भोंग्याचे वादळ संपेना..आणखी एका बड्या नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र !

मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध केल्याने राजकारण तापले आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama

ठाणे : मशिदीवरील भोंग्यांना विरोध करणारी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली आहे. त्यांनी हे भोंगे काढून टाकण्यासाठी राज्य सरकारला नवी डेडलाईन दिली आहे. यातच भोंग्यावरून मनसेत उठलेले वादळ उद्याप शमलेले नाही. आणखी एका नेत्याने राजीनामा दिल्याने राज ठाकरेंना धक्का बसला आहे. भोंगा प्रकरणी मनसेला महागात पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करीत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख (Irfan Shaikh) यांनी आज पदाचा राजीनामा दिला आहे. याचबरोबर पक्षाच्या सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. गुढीपाडव्याच्या सभेतही राज ठाकरेंनी भोंग्यांना विरोधाची भूमिका घेतली होती. यानंतर इरफान शेख एक यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट टाकली होती. त्यांनी म्हटले होते की, आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या? आज समाजाला कसे सामोरे जायचे? मला 16 वर्षांचा काळ आठवला आणि डोळ्यात पाणी आले. पक्षातील मुस्लिम कार्यकर्ते आणि समाज आता प्रश्न विचारू लागला आहे. मनसेची भूमिका काय, पक्षात काय चाललंय, अशी विचारणा लोक करीत आहेत.

Raj Thackeray
राजकारण तापलं! सोमय्यांच्या रडारवर ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य

पक्षाच्या स्थापनेपासून मी काम करतोय. अनेक आंदोलनात माझ्यावर गुन्हे दाखल झाले. मराठी पाट्यांसाठी 2008 मध्ये झालेल्या आंदोलनात पोलिसांनी अटक करून बेदम मारहाण केली होती. त्यावेळी तुम्हीच म्हणाला होती की, या जखमा विसरू नको, बाकी मी बघतो. आता आमची समाजात कुचंबणा तर दुसरीकडे पक्षात अस्थिर वातावरण आहे. पक्ष सुरू केल्यानंतर 16 वर्षांनी तुम्हाला अचानक मशीद, मदरसे आणि अजानचा संशय आला. आम्ही सोबत असताना तुम्ही या गोष्टी बोलला असता तर सोक्षमोक्ष झाला असता, असे शेख यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.

Raj Thackeray
कोल्हापूर उत्तरचा कौल कुणाला? फक्त तीनच तासांत होणार फैसला

मुंबईतील गुढी पाडव्याच्या सभेनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांच्या सभेचे नुकतेच ठाण्यात आयोजन करण्यात आले होते. या सभेत भोंग्यांना विरोध करण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला होता. ते म्हणाले होते की, मशिदींच्या भोंग्याचा अख्ख्या देशाला त्रास होतोय, यात धार्मिक तेढ कुठे आहे? तुम्हाला अजान पडायची आहे, तर त्यांनी ती घरात पडावी. शहरातली रस्ते फूटपाथ कशाला अडवता? प्रार्थना तुमची आहे, ती आम्हाला कशाला ऐकवता? सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मस्जिदीबाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com