Congress MLA N.A. Haris Sarkarnama
देश

ED Raid : बिटकॉइनप्रकरणी 'ईडी'ची छापेमारी; काँग्रेस आमदाराशी निगडीत 17 मालमत्तांवर कारवाई

ED raid in Bitcoin case linked to Congress MLA : बंगळूर विकास प्राधिकरण अध्यक्ष तथा काँग्रेसचे वरिष्ठ आमदार एन. ए. हॅरिस यांच्या निवासस्थानासह एकूण 17 ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाची छापेमारी केली.

Pradeep Pendhare

ED raid Karnataka : बंगळूर विकास प्राधिकरण (बीडीए) अध्यक्ष व काँग्रेसचे वरिष्ठ आमदार एन. ए. हॅरिस यांच्या निवासस्थानासह शहरातील एकूण 17 ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पहाटे एकाच वेळी छापेमारी केली. ही कारवाई बहुचर्चित बिटकॉइन प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय राखीव पोलिस दलाबरोबर घेत ईडी (ED) अधिकाऱ्यांनी अशोकनगर परिसरातील आमदार एन. ए. हॅरिस यांचे घर, तसेच त्यांचे पुत्र मोहम्मद नलपाड यांच्या निवासस्थानी छापे घातले. सुमारे 12 अधिकाऱ्यांच्या पथकाने घरातील कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी केली.

ही छापेमारी कर्नाटकातील (Karnataka) गाजलेल्या बिटकॉइन प्रकरणाच्या तपासाचा भाग आहे. मुख्य आरोपी श्रीकृष्ण ऊर्फ श्रीकी याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई केली आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी झालेल्या अंदाजे 4.5 कोटींच्या आर्थिक व्यवहारांमुळे ईडीचे लक्ष या प्रकरणाकडे वळले.

यापूर्वी जून 2024मध्ये राज्याच्या केंद्रीय तपास संस्थेच्या (सीआयडी) विशेष तपास पथकाने मोहम्मद नलपाड यांची चौकशी केली होती. तसेच 2021मध्ये केंद्रीय गुन्हे शाखे (सीसीबी) कडून प्राथमिक माहिती गोळा केली होती. त्यानंतर सीआयडीकडील अधिकृत कागदपत्रे मिळाल्यानंतर ईडीने गुन्हा नोंदवून तपास वेगाने सुरू ठेवला.

हॅकिंग, क्रिप्टो व्यवहार अन् मनी लॉन्डरिंग

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वेबसाईट्स तसेच डिजिटल वॉलेस् हॅक करून क्रिप्टोकरन्सीची चोरी केली. ही डिजिटल मालमत्ता विविध क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर विकून त्यातून मिळालेला पैसा बँक खात्यांद्वारे वळविला. श्रीकृष्ण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा पैसा वैयक्तिक फायद्यासाठी वापरला. श्रीकृष्ण आणि रॉबिन खंडेवाल यांच्यातील आर्थिक व्यवहारांचाही तपासात उल्लेख आहे.

नलपाड-श्रीकी आर्थिक संबंधांवर संशय

मोहम्मद नलपाड आणि श्रीकी यांच्यात सुमारे सहा वर्षांपूर्वी आर्थिक संबंध होते आणि दोघांमध्ये जवळपास 4.5 कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT