Rahuri Bypoll : 'भाजपमध्ये प्रवेश करणार नाही'; प्राजक्त तनपुरेंची भूमिका, राम शिंदे भेटीला, पोटनिवडणुकीत पाठिंबा कोणाला? (Video)

Amid speculation over the Rahuri by-election, Prajakt Tanpure holds worker meetings as BJP Ram Shinde pays a significant visit : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोणता निर्णय घ्यायचा, यासाठी सकाळपासून कार्यकर्त्यांबरोबर बैठकींचा सपाटा लावला आहे.
Prajakt Tanpure holds
Prajakt Tanpure holdsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Rahuri by-election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेणारे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी, मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबर सकाळपासून बैठकांचा सपाटा सुरूच ठेवला आहे.

यातच बैठकांमध्ये त्यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याची भूमिका मांडली आहे. कार्यकर्त्यांबरोबर बैठका सुरू असतानाच, भाजपचे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे. तत्पूर्वी प्रा. शिंदे यांनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

राहुरी पोटनिवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) कोणता निर्णय जाहीर करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. तनपुरेंनी निवडणूक लढू नये, यासाठी भाजप नेत्यांची शिष्टाई यशस्वी ठरली. पण भाजपचा उमेदवार जिंकून येण्यासाठी, राहुरीतून मतदान मिळण्यासाठी तनपुरेंची भाजपची आवश्यकता आहे. यासाठी भाजपचा त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे.

प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीत कोणता निर्णय घ्यायचा, यासाठी सकाळपासून मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबर (Worker) बैठकांचा धडाका लावला आहे. राहुरी मतदारसंघातील प्रमुख गावातील कार्यकर्त्यांना तसं तनपुरेंकडून आमंत्रण देण्यात आले आहेत.

Prajakt Tanpure holds
Prajakt Tanpure : राहुरीत नाश्त्यावर रंगली ‘राजकीय खिचडी’! तनपुरेंबरोबर चव्हाण-विखे; फडणवीसांशी फोनवर चर्चा

मतदारसंघातील सुमारे 90 ते 110 पेक्षा अधिक गावांतील प्रमुख कार्यकर्ते तनपुरेंना सायंकाळपर्यंत भेटून गेले आहेत. या कार्यकर्त्यांनी दादा जो निर्णय घेतील, त्याबरोबर आम्ही आहोत, अशी भूमिका मांडली आहे. कार्यकर्त्यांबरोबर बैठका सुरू असतानाच, तनपुरेंनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची भूमिका मांडली आहे.

Prajakt Tanpure holds
Rahuri Bypoll Clash : 'मविआ की भाजप?' फडणवीसांची सभा अन् तनपुरेंचा निर्णायक मेळाव्याच्या टायमिंगमुळे चर्चांना उधाण!

प्राजक्त तनपुरे यांच्या बैठका सुरू असतानाच, भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे तिथे पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात राहुरीत सभा होत आहे. तत्पूर्वी प्रा. राम शिंदेंनी तनपुरेंची भेटीसाठी पोहोचल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

प्रा. राम शिंदे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे आहेत. फडणवीसांना त्यांच्यामार्फत तनपुरेंकडे काही निरोप दिला आहे का? अशी चर्चा आता रंगली आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस सभेसाठी येताच, तनपुरेंची भूमिका आणि निर्णय स्पष्ट होईल, असे काहींकडून सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com