Niti Aayog meeting:  Sarkarnama
देश

Niti Aayog meeting: नीती आयोगाच्या बैठकीतच विरोधकांनी ताकद दाखवली; तब्बल आठ मुख्यमंत्र्यांची दांडी!

Niti Aayog Meeting: नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकलेले आठ मुख्यमंत्री कोण?

सरकारनामा ब्यूरो

Delhi: देशाच्या नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता नीती आयोगाच्या बैठकीवरही विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज नीती आयोगाची बैठक पार पडत आहे.

या बैठकीसाठी केंद्र शासित प्रदेशाचे राज्यपाल आणि जवळपास सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. मात्र, देशातील आठ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे हे आठ मुख्यमंत्री कोण? आणि ते उपस्थित न राहण्याचं कारण काय? असे अनेक सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहेत.

नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकलेले आठ मुख्यमंत्री कोण?

यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

दिल्लीत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांच्या अधिकारावरून केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. याच मुद्यांवरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

दरम्यान, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीत आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांवर काय निशाणा साधतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT