Sharad Pawar News Sarkarnama
देश

Sharad Pawar Delhi Meeting: दिल्लीत शरद पवारांच्या बैठकीत झाले 'हे' महत्त्वाचे आठ ठराव

सरकारनामा ब्यूरो

NCP Delhi Meeting News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज (ता. ६ जुलै) महत्त्वाची बैठक झाली. या वेळी दोन खासदार आणि नऊ आमदारांचे निलंबन करण्यात आले. यामध्ये खासदारांमध्ये प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश आहे.

याशिवाय एस. आर. कोलहली यांचेही निलंबन करण्यात आले. या बैठकीत राष्ट्रवादीच्या समितीने एकूण आठ ठराव मंजूर केले. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, पक्षाचे पुढील धोरण काय असावे, कुणाबरोबर युती करावी यावर चर्चा झाली. पवार म्हणाले, मला पूर्ण विश्वास आहे, २०१४ मध्ये महाराष्ट्रात सत्ता बदलेल.

NCP Delhi meeting

आज जे सत्तेत आहे त्यांना लोक दूर करतील. राज्यातील विरोधी पक्षांविरोधात ज्या प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या त्याची जोरदार किंमत मोजावी लागेल, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले. जे महाराष्ट्रात सुरू आहे त्याबाबत मला आनंद आहे. याची मोठी किंमत मतदारांना आश्वासन देऊन चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना मोजावी लागणार.

राज्यातील सत्तेत बदल होतील. जनता राष्ट्रवादी, काँग्रेस (Congress) व उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena) यांच्या हातात सत्ता देईल, असेही पवारांनी सांगितले. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. दुसऱ्या कुणी काय म्हटले? त्याला काही अर्थ नाही आहे. कोण काय म्हणते त्याच्याशी काही करायचे नाही. आजही जी कार्यकारिणी झाली, ती माझ्या अध्यक्षतेखाली झाली असे पवार यांनी स्पष्ट केले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT