Sharad Pawar Delhi News : ज्यांनी हे केले त्यांना जोरदार किंमत मोजावी लागले; शरद पवारांनी ठणकावले

NCP News : जे काही होत आहे, त्याचा मला आनंद आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : जे काही होत आहे, त्याचा मला आनंद आहे. ज्यांनी हे केले त्यांना जोरदार किंमत मोजावी लागले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्रात पूर्ण बहुमत असले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

दिल्लीत आज (ता. 6 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. या वेळी बोलताना पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच आहे. बाकी कोणी काय बोलतोय यात काही तथ्य नाही.

Sharad Pawar News
Sharad Pawar Meeting in Delhi: राजकीय घडामोडींना वेग; राहुल गांधी शरद पवारांच्या भेटीला

तसेच अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. तुमचे वय ८२, ८३ झाले तरीही थांबणार आहात की नाही? असे अजित पवार म्हणाल होते. याला पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शरद पवार म्हणाले, मी कुठेही थांबण्याचा प्रश्न येत नाही. मी आता आणखी जोमाने काम करणार. वय ८२ होऊ द्या किंवा ९२ होऊ द्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष मीच आहे. दुसऱ्या कुणी काय म्हटले त्याला अर्थ नाही. कोण काय म्हणते त्याच्याशी मला काही करायचे नाही आहे. आजही जी कार्यकारिणी झाली ती माझ्या अध्यक्षतेखाली झाली असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Sharad Pawar News
Sharad Pawar News : वेळ येईल तेव्हा, बहुमत कुणाकडे ते दाखवू; पवारांचा इशारा

शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रीय स्तरावरील नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी एकमताने पवारांना पाठिंबा दिला. या बैठकीत अजित पवारांसह ९ आमदारांना आणि दोन खासदारांना निलंबित करण्यात आले. इतर राज्यातील कमिट्यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com