Amit Shah, Eknath Shinde  Sarkarnama
देश

Eknath Shinde : शहांसमोर एकनाथ शिंदेंकडून ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’चा नारा; 2022 मधील बंडाची आठवण अन् तोंडभरून कौतुकही...

Eknath Shinde’s 'Jai Maharashtra, Jai Gujarat' Moment : पुण्यात जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा दिली.

Rajanand More

पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण संपविताना जय महाराष्ट्रसोबत जय गुजरातचा नारा दिला आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. जय गुजरातचा नारा देण्याआधी शिंदेंकडून 2022 मधील सत्तानाट्याची आठवण काढत शहांचे तोंडभरून कौतुकही केले.

पुण्यात जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा दिली. ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तूचे भूमिपूजन झाले होते. आज अमित शहांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. आजचा दिवस पुणे गुजराती बंधू समाजासाठी ऐतिहासिक आहे. मी पाहत होतो, इथे काय-काय बनवले आहे. इथे कशाचीच कमी नाही, कारण तुम्ही सर्वजण लक्ष्मीपूत्र आहात. त्यामुळे काहीच कमी पडणार नाही. तुमचे स्वप्न आज वास्तवात आले. मोदीजी ज्या कामाचे भूमिपूजन करतात, ती वेगाने पूर्ण होतात. समृध्दी हायवे, अटल सेतू, मेट्रोचे भूमिपूजन व लोकापर्णही मोदींनी केले.

अमितभाई आणि मोदीजी आमच्यासाठी वेगळे नाहीत. मोदींची सावली अमितभाई आहेत. अमितभाईंचा स्पर्श झाल्यानंतर त्या कामाचे सोनं होतं. कोणतेही शहर असो, गृहसंकुल असो... पण तिथे जोपर्यंत बाजारपेठ नाही, तोपर्यंत तिथली शोभा वाढत नाही. ते बनविणारे तुम्ही आहात. तुमच्याशिवाय कुठल्याही शहराची शोभा वाढत नाही, असे शिंदे म्हणाले.

मला 2022 मध्ये अनुभव आला आहे. राज्यात दुकाने, घरं, मंदीर, सण बंद होते. सगळे स्पीडब्रेकर होते. त्यावेळी सर्वसामान्यांचे सरकार आणण्याची आवश्यकता होते. मी गर्वाने सांगतो की, त्यावेळी मोदींचे मार्गदर्शन तर होतेच पण अमितभाई माझ्यामागे खंबीरपणे उभे होते. ते काम सोपे नव्हते. पण जेव्हा राज्याच्या विकासासाठी अशी पावले उचलावी लागता. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्यामुळे आमचे डबल इंजिनचे सरकार धावत असल्याचे शिंदेंनी सांगितले.

अमितभाई तर महाराष्ट्राचे जावई. देशाचे ते गृहमंत्री आहेत. पण त्यांच्या गृहमंत्री कोल्हापूरच्या आहेत. त्यांच्या घरात मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषा आनंदाने नांदतात. म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांनी विकास, उद्योग आणि संस्कृतीच्या क्षेत्रात नेहमीच देशाला दिशा दाखवली असल्याचे शिंदे म्हणाले.

व्यापारी, उद्योजक विकासासाठी आवश्यक आहेत. तुम्हाला व्यवसायात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास शिंदेंनी दिला. त्यानंतर त्यांनी शहांचे कौतुक करणारी शायरी सुनावली आणि भाषण संपवले. शहांचे तोंडभरून कौतुक केल्यानंतर भाषण संपविताना त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असा नारा दिला. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT